पर्यावरणपूरक प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्रीन बॉंड इश्यू केले जाणार आहेत. भारतातील ग्रीन बॉंडचा हा इश्यू आहे. पहिल्या टप्प्यात ग्रीन बॉंडमधून 8000 कोटी उभारले जाणार आहेत. आज 25 जानेवारी 2023 रोजी ग्रीन बॉंड्स इश्यू गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ग्रीन बॉंड्सला लिलाव केला जाणार आहे. जाणून घेऊया ग्रीन बॉंड्समध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया.
ग्रीन बॉंडमध्ये परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे. विमा कंपन्या, म्युच्युअल फंड्स, बँकांना आणि किरकोळ गुंतवणूकदारांना ग्रीन बॉंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. रिझर्व्ह दोन्ही टप्प्यात प्रत्येकी 8000 कोटी रुपयांचे हरित बाँड जारी केले जातील. यामध्ये दोन मॅच्युरिटी कालावधीच्या आधारे बाँड जारी केले जातील. 4000 कोटी रुपयांचे रोखे 5 वर्षांच्या मॅच्युरिटीचे असतील आणि 4 हजार कोटी रुपयांचे रोखे १० वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी असतील, असे बँकेने म्हटले आहे.
ग्रीन बॉंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यातील पुढील प्रक्रिया पुढीलप्रमाणे
- RBI-Retail Direct या वेबसाईटला भेट द्या
- तिथं वैयक्तिक किंवा जॉइंट अकाउंट सुरु करण्यासाठी माहितीचा तपशील द्या.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेलवर OTP येईल. तो व्हेरिफाय करा.
- OTP व्हेरिफाय केल्यानंतर कॅन्सल चेक अपलोड करा किंवा तुमचे खाते व्हेरिफाय करण्यासाठी परवानगी द्या.
- दोन दिवसांत तुमचे खाते अॅक्टिव्हेट झाल्याचा तुम्हाला मेसेज केला.
ज्या प्रकारे वैयक्तिक गुंतवणूकदार गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात तशाच प्रकारे ग्रीन बॉंडमध्ये देखील गुंतवणूक करता येते. दोन्हीची गुंतवणूक प्रक्रिया सारखीच आहे. याशिवाय काही निवडक ब्रोकर्सकडून देखील ग्रीन बॉंड्समध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा पुरवली जाते.
पर्यावरणपूरक ऊर्जा प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प, प्रदूषण रोखणारे आणि नियंत्रणात आणणारे प्रकल्प, नैसर्गिक साधन संपत्तीशीसंबधित प्रकल्प, जमीन व्यवस्थापन, स्वच्छ इंधन, जल वाहतूक, ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट्स या प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी ग्रीन बॉंड्स इश्यू केले जातात