• 05 Feb, 2023 12:29

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Green Bonds: ग्रीन बॉंड्स म्हणजे काय? त्यात कोण गुंतवणूक करु शकते?

Green Bonds

What is Green Bonds: केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच ग्रीन बॉंड इश्यू केले जाणार आहेत. ग्रीन बॉंडमधून दोन टप्प्यात सरकार 16000 कोटी उभारणार आहे. ग्रीन बॉंडमधून पहिल्यांदाच एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा गुंतवणूक पर्याय भारतात उपलब्ध होणार आहे.

ग्रीन बॉंड्सच्या नावातच या बॉंडमधील निधी हा पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरला जाणार हे स्पष्ट होते. जागतिक स्तरावर हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपन्यांकडून पर्यावरण पूरक प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी ग्रीन बॉंड्सचा वापर लोकप्रिय आहे. (What is Green Bonds)

ग्रीन बॉंड्स किंवा क्वायमेट बॉंड्स हा कॉर्पोरेट आणि सरकारी खात्यांसाठी चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे. ग्रीन बॉंड्सला आकर्षक करण्यासाठी कर सवलत देखील दिली जाते.

ग्रीन बॉंड्स कसे कार्य करते? Green Bonds How it Works?

ग्रीन बॉंड्स (Green Bonds) हे सर्वसाधारण पारंपारिक बॉंड्स (Conventional Bonds)सारखेच असतात. हे एक प्रकारचे कर्ज असते जे कंपनी किंवा सरकारला गुंतवणूकदाराकडून उपलब्ध होते. ज्यात गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीवेळी मुद्दल मिळेत. त्यासोबत व्याज देखील मिळते.

ग्रीन बॉंड्स आणि पारंपारिक बॉंड्समधील मुख्य फरक म्हणजे यातील पैसा कोणत्या प्रकल्पांसाठी वापरला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी  ग्रीन बॉंड्स इश्यू केले जाते. दुसऱ्या बाजूला पारंपारिक बॉंड्स हे इतर प्रकल्पांसाठी आणि भांडवलाची गरज भागवण्यासाठी किंवा रिफायनान्सिंगसाठी इश्यू केले जाते. पर्यावरणपूरक ऊर्जा प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प, प्रदूषण रोखणारे आणि नियंत्रणात आणणारे प्रकल्प, नैसर्गिक साधन संपत्तीशीसंबधित प्रकल्प, जमीन व्यवस्थापन, स्वच्छ इंधन, जल वाहतूक, ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट्स या प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी ग्रीन बॉंड्स इश्यू केले जातात.

ग्रीन बॉंड्सचा इतिहास (History of Green Bonds)

संयुक्त राष्ट्रांच्या एका एजन्सीकडून (Intergovernmental Panel for Climate Change) वर्ष 2007 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगबाब स्विडीश पेन्शन फंडांनी ग्रीन बॉंड्स इश्यू केले होते. वर्ष 2008 मध्ये वर्ल्ड बँकेने ग्रीन बॉंड्स इश्यू केले होते. आतापर्यंत जवळपास 50 देशांमध्ये ग्रीन बॉंड्स इश्यू करण्यात आले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक ग्रीन बॉंड्सचे इश्यू केले आहेत. वर्ष 2020 मध्ये 350 बिलियन डॉलर्सचे ग्रीन बॉंड्स इश्यू केले होते. 

ग्रीन बॉंड्समध्ये कोण गुंतवणूक करु शकते? (Who Will Invest in Green Bonds)

ग्रीन बॉंड्समध्ये विशेषकरुन संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणूक करता येते. रिझर्व्ह बँकेकडून भारतात जारी होणाऱ्या ग्रीन बॉंड्समध्ये बँका, म्युच्युअल फंड कंपन्या, विमा कंपन्या, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FPI) यांना गुंतवणूक करता येईल. रिझर्व्ह बँक ज्या प्रकारे सरकारी रोखे इश्यू करते तसेच ग्रीन बॉंड्सचे ऑक्शन करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार थेट आरबीआयच्या वेबसाईटवर जाऊन ग्रीन बॉंड्ससाठी बोली लावू शकतात.