बचत किती, कधी आणि कशी करावी?
याचे उत्तर खरेच शिक्षणाच्या प्रकारावर आधारित आहे. प्रायव्हेट शाळा, सरकारी शाळा, व्यावसायिक कोर्सेस, पदवी कोर्सेस, तसेच भारतीय संस्था, युरोपियन किंवा अमेरिकन बोर्ड असे शिक्षणाचे अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत. साधारण सरकारी शाळा आणि सरकारी महाविद्यालयांमधील फी तुलनेने कमी असते परंतु त्यांच्याशी संबंधित अतिरिक्त ट्युशन इत्यादींशी संबंधित खर्च असू शकतो. त्याचप्रमाणे भारतातील संस्था परदेशातील संस्थांपेक्षा स्वस्तामध्ये शिक्षण देतात. परदेशात शिक्षण घेताना तिथे राहण्याचा खर्च देखील विचारात घ्यावा लागतो. एकदा तुम्ही सध्याच्या खर्चाचा अंदाज घेतला की, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती निधी आवश्यक आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला चलनवाढीचा दर देखील विचारात घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, भारतातील एका चांगल्या नामांकित बिझनेस स्कूलमधील एमबीए शिक्षणासाठी अंदाजे रु. 10 लाख खर्च पकडू. त्याचबरोबर 8% महागाई दर गृहित धरल्यास तुम्हाला शिक्षणासाठी अंदाजे 45 ते 50 लाख रूपये लागतील.
साहजिकच शक्य तितक्या लवकर बचतीला सुरुवात करावी लागेल. खरं तर, काही जोडपी मुल जन्माला घालायचा विचार करतात तेव्हाच हा बचतीचा विचार करतात. तर काही मूल जन्माला आल्यानंतर लगेचच बचतीला आणि गुंतवणुकीला सुरुवात करतात.अशाप्रकारे खूप लवकर सुरुवात केल्याने चक्रवाढ व्याजाची जादु तुम्हाला अनुभवायला मिळेल. या बचतीची आपण गुंतवणूक कशी करू? बहुतेक पालक त्यांचे पैसे पीपीएफ किंवा कमी जोखमीच्या बचत योजनांमध्ये गुंतवतात. मानसिकदृष्ट्या ह्यामुळे तुमचे समाधान होऊ शकते. परंतु कमी परतावा म्हणजे पालकांना दर महिन्याला जास्त रक्कम वाचवावी लागेल.
जर तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन स्वत: करणे जमत नसेल तर विविध इन्श्युरन्स कंपन्या, बँका आणि इतर फायनानशिअल सर्व्हिसेस देणाऱ्या संस्थांच्या अनेक शैक्षणिक योजना आहेत ज्या तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करतात. तुमच्या फायनानशिअल प्लॅनरची मदत घ्या. पण ते खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला शुल्क, खर्च, रिस्क फॅक्टर, टॅक्स इत्यादी सर्व तपशील समजून, खात्री करुन घ्या.
उच्च शिक्षणाचे विविध पर्याय पडताळा!
तुमच्या मुलांना शक्य तितके उत्तम शिक्षण मिळावे अशी तुमची इच्छा आहे. पण शाळा आणि विद्यापीठाचा खर्च अधिक असू शकतो. फी खूप असू शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करता ते पैसे तुमच्या कुटुंबाच्या सर्वात मोठ्या खर्चांपैकी एक असू शकतात.
लवकर बचत करणे आपल्या मुलांना उच्च-गुणवत्तेचा शिक्षण अनुभव घेण्यास मदत करेल. तुम्हाला तुमच्या मुलांनी सार्वजनिक किंवा खाजगी शाळांमध्ये जायचे आहे की नाही आणि त्यांनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयात जायचे आहे की नाही यावर तुम्हाला किती पैशांची गरज आहे हे अवलंबून आहे.
विद्यापीठ किंवा महाविद्यालयात जाण्याचा खर्च देखील बदलू शकतो. जरी त्यांना फी माफी मिळाली तरीही, तुमच्या मुलाला पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य, स्पोर्ट्स फी आणि वाहतूक खर्चासाठी पैसे द्यावे लागतील. युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजशी संपर्क साधा आणि या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक सेमिस्टरला किती खर्च येईल ते शोधा, म्हणजे तुम्हाला किती पैसे वाचवायला लागतील याची कल्पना येईल.
तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जितक्या लवकर बचत करायला सुरुवात कराल तितके चांगले शैक्षणिक खर्च हे सहसा दीर्घकालीन उद्दिष्ट असते. जे साध्य करण्यासाठी 5 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. शैक्षणिक निधीसाठी अर्ज करण्यासाठी कधीही दबावाखाली येऊ नका. जर तुमच्याकडे एजंटने संपर्क साधला असेल तर तुम्ही सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचण्यासाठी वेळ मागितला पाहिजे. छोट्या छोट्या पायऱ्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी बचतीची सुरुवात केल्यास त्याचा उपयोग योग्य वेळी आपल्या मुलांना होऊ शकतो .