Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Score Improvement: होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा?

How to Improvement Credit Score

Image Source : www.velocitymart.com

Credit Score Improvement: बँकांकडून सर्वांना सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. पण यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांना अधीन राहूनच बँका ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. तर आजच्या लेखात आपण वर नमूद केलेल्या दोन प्रमुख कारणांपैकी कमी क्रेडिट स्कोअर असल्यावर काय करावे आणि तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतात. याबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्यापैकी अनेक जण होम लोनसाठी अर्ज करतात. पण त्यातील किती जणांना कर्ज मिळत असेल. तुम्हाला काय वाटते? सर्वांनाच बँका कर्ज देतात का? तर याचे उत्तर नाही असे नाही. बँका सर्वांना कर्ज देत नाही. अनेकांचे कर्जाचे अर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी रिजेक्ट (बाद) केले जातात. यातील दोन कारणे खूपच बेसिक आणि महत्त्वाची आहेत. त्यातील पहिले कारण आहे ते म्हणजे, लो क्रेडिट स्कोअर (Low Credit Score) आणि दुसरे म्हणजे अपुरी कागदपत्रे.

बँकांकडून सर्वांना सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. पण यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांना अधीन राहूनच बँका ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. तर आजच्या लेखात आपण वर नमूद केलेल्या दोन प्रमुख कारणांपैकी कमी क्रेडिट स्कोअर असल्यावर काय करावे आणि तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतात. याबद्दल जाणून घेणार आहोत.

गृह कर्ज घेताना प्रामुख्याने सर्वच बँका ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर तपासून त्याला कर्ज देते. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर ग्राहकांना बँकांकडून लगेच कर्ज मंजूर केले जाते. क्रेडिट स्कोअर ही कर्ज घेणाऱ्या ग्राहकाची आर्थिक स्थिती मोजण्याचे काम करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे बँका या प्रक्रियेला खूप महत्त्व देतात. तुम्हाला जर होम लोन हवे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर हा चांगला असणे गरजेचा आहे.

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

क्रेडिट स्कोअर हा असा एक क्रमांक आहे; जो संबंधित व्यक्तीचे कर्ज परत करण्याची पत तपासतो. यामध्ये 300 पासून 850 पर्यंतची रेंज असते आणि ही पत तपासण्याचे काम म्हणजेच क्रेडिट स्कोअर इश्यू करण्याचे काम सिबिल क्रेडिट एजन्सी (CIBIL Credit Agency) करते. सिबिल क्रेडिट कंपनी या प्रकारचे काम अनेक वर्षांपासून करत आहे. त्यामुळे अनेक बँका सिबिल क्रेडिट स्कोअरला प्राधान्य देतात.

होम लोनसाठी क्रेडिट स्कोअर किती लागतो?

क्रेडिट स्कोअर ही यंत्रणा सध्या आपल्या सर्वांच्या आर्थिक जीवनावर परिणाम करु शकते. कारण कोणतेही कर्ज घेताना सर्वप्रथम क्रेडिट स्कोअर तपासला जातो. एक चांगला क्रेडिट स्कोअर किती असतो ते जाणून घेऊया.

750 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला क्रेडिट स्कोअर हा खूप चांगला स्कोअर मानला जातो. यामध्ये होम लोन मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यानंतर 650 ते 750 या दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी अनेक बँका कर्ज देण्यासाठी तयार असतात. 550 ते 650 या दरम्यान असलेल्या क्रेडिट स्कोअर ग्राहकांना बँका कर्ज उपलब्ध करून देतात. पण या कर्जाचा व्याजदर हा जास्त असू शकतो. त्यानंतर 550 किंवा त्यापेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्ज मिळण्याची शक्यता खूप कमी असते.

सिबिल स्कोअर वर नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध असेल तर होम लोन लगेच मंजूर होते. पण जितका क्रेडिट स्कोअर कमी असेल, तितका व्याजदर ग्राहकांना जास्त लागू होऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअरचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार तो जास्त कसा राहील हे समजून घेणे आवश्यक आहे.

सिबिल स्कोअर कमी होण्याची कारणे

सिबिल स्कोअर परिणाम करणारे 3 ते 4 महत्त्वाची कारणे आहेत. त्यातील सर्वांत पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, या पूर्वीच्या कर्जाची परतफेड (History of Payments) तुम्ही कशी केली आहे. त्यानंतर क्रेडिट लिमिटचा तुम्ही कशाप्रकारे वापर (Credit Limit Unilization) केला आहे. सध्या इतर कोणते कर्ज सुरू आहे का? आणि शेवटचे कारण म्हणजे तुम्ही कोणती असुरक्षित कर्जे घेतली आहेत का? प्रामुख्याने या 4 कारणांचा सिबिल स्कोअर मोजताना विचार केला जातो. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो.

सिबिल स्कोअर वाढवायचा कसा?

सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल किंवा तो पूर्वीपेक्षा वाढवायचा असेल तर आर्थिक शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल आणि त्याचे हप्ते वेळेवर भरत नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो. हप्ते वेळेवर न भरणे हे बॅड फायनान्शिअल हॅबिटमध्ये (चुकीच्या आर्थिक सवयी) मोडते. यामुळे तुमचा होम लोनचा अर्ज विचारातच घेतला जाणार नाही.

तुम्हाला तुमचा आर्थिक व्यवहार आणि सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल, तर काही आर्थिक सवयी तुम्हाला निक्षून पाळाव्या लागतील. ज्यामुळे तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा होऊन वाढ होईल.

  • क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुका दुरुस्त करा.
  • कोणत्याही कर्जाचे हप्ते वेळेवर भरत जा.
  • असुरक्षित कर्जे घेणे टाळा.
  • क्रेडिट लिमिटची मर्यादा पाळा.
  • क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त खरेदी करू नका.
  • सातत्याने रिजेक्ट करणाऱ्या बँकांकडे पुन्हा-पुन्हा अर्ज करू नका.


तुमच्या आर्थिक व्यवहारांना काही प्रमाणात शिस्त लावल्यास तुमचे अर्धे काम हलके होईल. तसेच कर्ज फेडण्यात टाळाटाळ करण्यापेक्षा त्याचे नियमित हप्ते वेळेवर भरण्यावर लक्ष द्या. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच सुधारेल आणि भविष्यात त्यात वाढ देखील होईल.