Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5G Plan साठी किती रुपयांचा रिचार्ज करावा लागणार?

New 5G Plan

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी इतर मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत जिओ कंपनीचा 5G प्लॅन सर्वांत स्वस्त असेल, अशी घोषणा केली होती. त्याचबरोबर एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन या कंपन्यांचे प्लॅन कसे असतील, हे पण आपण जाणून घेणार आहोत.

5G service cost : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशात 5G सेवा सुरू केली. तेव्हापासून, देशातील टेलिकॉम क्षेत्रासाठी काम करणाऱ्या देशी आणि विदेशी कंपन्यांच्या वतीने 5G सेवा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे. सध्या एअरटेलने राजधानी दिल्ली, मुंबई, वाराणसी, बंगळुरू, गुरुग्राम, चेन्नईसह एकूण 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली. जिओ दिवाळीच्या आसपास 5G सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्या 5G सेवेसाठी कोणते रिचार्ज प्लॅन ऑफर करणार आहेत. (How much will it cost per month for 5G plan?)


जाणून घ्या दर महिन्याला किती करावा लागणार खर्च?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एका भाषणात नमूद केले होते की,  पूर्वी 1GB इंटरनेट डेटाची किंमत सुमारे 300 रुपये होती. पण आता ती जवळपास 10 रुपये झाली आहे. सध्या देशातील एक इंटरनेट वापरकर्ता दर महिन्याला सरासरी 14GB डेटा वापरतो. 300 रुपये प्रति जीबी दराने 14GB डेटाची किंमत 4200 रुपये झाली. मात्र केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आज महिन्याला वापरल्या जाणाऱ्या डेटासाठी सरासरी 125 ते 150 रुपये खर्च येत आहे. जिओ 5G प्लॅनबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले होते की,  देशातील दूरसंचार क्षेत्रासाठी काम करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या तुलनेत जिओ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन सर्वात स्वस्त असेल. त्याचवेळी एअरटेलच्या बाजूने असे सांगण्यात आले आहे की, सध्या 4G सेवेसाठी जे रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत. तेच प्लॅन 5Gसाठी दिले जाणार आहेत. (New Plans for Jio 5G, Vi 5G, BSNL 5G, Airtel 5G)

किती पर्यंत जावू शकतो 5G प्लॅन?

इंटरनेट डेटासह सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळविण्यासाठी देशातील लोक सरासरी 400 ते 600 रुपये दर महिन्याला खर्च करतात. यावरून 5G सेवेसाठी रिचार्ज प्लॅनची किंमत ठरवण्यात येईल, असे म्हटले जात आहे. मात्र यासाठी ग्राहकांना एअरटेल आणि जिओच्या कन्फर्मेशनची वाट पहावी लागणार आहे. Vodafone-Idea (Vi) व्होडाफोन-आयडिया कंपनीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडून 5G सेवा सुरू करण्याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बीएसएनएल (BSNL) पुढील वर्षापासून म्हणजे 15 ऑगस्ट, 2023 पासून 5G सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे या दोन टेलिकॉम सेवा संस्थांच्या ग्राहकांना या 5G सेवेसाठी बराच वेळ वाट बघावी लागणार आहे.