Income Tax Rule: भारतात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रान्जेक्शन(Digital Transactions) सिस्टीम विकसित झाली आहे. मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक इमरजेंसीसाठी(Emergency) केवळ कॅशवरच(Cash) अवलंबून असलेले पाहायला मिळतात. याच कारणामुळॆ लोक त्यांच्या घरी जास्तीत जास्त कॅश ठेवण्यासाठी प्राधान्य देतात. पण आपण घरात साधारण किती कॅश ठेवू शकतो याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? आयकर विभागाचा नियम काय सांगतो, चला सविस्तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
घरात किती कॅश ठेवता येते?(How much cash can be kept?)
आयकर विभागाच्या नियमानुसार(Income Tax Rule), तुम्हाला हवी तेवढी रोख रक्कम तुम्ही घरात ठेवू शकता. याबाबत सरकारने कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र अट अशी आहे की, तुमच्याकडे जी काही रोख रक्कम उपलब्ध आहे, ती कुठून आली आणि त्याचा स्रोत(Source) काय त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
टॅक्स भरणे आवश्यक आहे(Tax must be paid)
जर तुम्ही घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणार असाल तर त्यावर संपूर्ण टॅक्स(Tax) भरणे आवश्यक असणार आहे. याशिवाय, तुमच्याकडे टॅक्स भरण्यासाठी लावणारी संबंधित सर्व कागदपत्रे(Documents) असणे आवश्यक आहे, जेणेकरुन इनकम टॅक्स विभागाकडून यासंदर्भात विचारणा झाल्यास तुम्ही रोख रकमे संबंधित कोणतीही माहिती सहजपणे देऊ शकता. तसेच त्यांचाही तुमच्यावर सहज विश्वास बसेल.
अशावेळी आकारला जाऊ शकतो दंड(Penalty may be levied)
तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच, जर तुम्ही त्या रोख रकमेची विचारण्यात आलेली योग्य माहिती देऊ शकला नाही, तर तुम्हाला मोठा दंड(Penalty) भरावा लागू शकतो. आयकर विभागाने छाप्यात जप्त केलेल्या रकमेच्या जवळपास 137 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
कॅशसंबंधीत 'या' गोष्टी माहिती असाव्यात?(Things you should know about cash?)
- एकावेळी बँकेतून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढताना किंवा जमा करताना खातेधारकाला त्याचे पॅन कार्ड(Pan Card) दाखवावे लागेल
- कोणत्याही खरेदीच्या वेळी, 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरता येत नाही. यासाठी तुम्हाला पॅन आणि आधार देखील दाखवावा लागेल
- याशिवाय तुम्ही तुमच्या बँक खात्यात एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट(Deposit) केली असेल तर बँकेमध्ये पॅन आणि आधार दाखवावे लागते