नवीन वर्षातही कारच्या मागणीत सातत्याने वाढ होण्याचा अंदाज आहे. अनेक गाड्यांवर दीर्घ प्रतीक्षा कालावधीही सुरू आहे. बुकिंग करूनही कोणत्या गाड्यांसाठी तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, ते जाणून घेऊया.
Scorpio N ही भारतीय कंपनी महिंद्राने गेल्या वर्षी बाजारात आणली होती. महिंद्राच्या या प्रीमियम SUV ला देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे आणि अतिशय कमी कालावधीत तिला प्रचंड बुकिंग मिळाले आहे. आता जानेवारी 2023 मध्येही त्याची मागणी कायम राहणणार असल्याचा अंदाज आहे. ही SUV बुक केल्यानंतर, तुम्हालाही ती घरी आणण्यासाठी 24 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते.
Scorpio N सोबत, महिंद्रा XUV700 देखील ऑफर केली जाते. XUV700 साठी प्रतीक्षा कालावधी देखील सुमारे 15 महिने इतका आहे. दक्षिण कोरियाची कार कंपनी Kia ची MPV Carens देखील भारतीयांच्या पसंतीची आहे. या MPV साठी देखील जवळपास 11 महिने वाट पहावी लागेल. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट SUV Brezza देखील अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. या SUV साठी तुम्हाला जवळपास तीन ते चार महिने वाट पाहावी लागेल.
Kia च्या कॉम्पॅक्ट SUV Sonet साठी देखील प्रतीक्षा कालावधी मोठा आहे. या एसयूव्हीमुळे तुम्हाला नऊ महिने वाट पहावी लागेल. Carens प्रमाणेच मारुतीची Ertiga ला देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. कमी किंमत तसेच CNG पर्यायामुळे तीची आकर्षकता वाढली आहे. यासाठी सात महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
Hyundai ची मध्यम आकाराची SUV Creta ही तरुणाईच्या पसंतीस उतरली आहे. या एसयूव्हीचा प्रतीक्षा कालावधी देखील सुमारे पाच ते सहा महिन्यांचा आहे. क्रेटाप्रमाणे, किया सेल्टोसलाही पाच ते सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.
मारुतीच्या ग्रँड विटाराच्या काही प्रकारांसाठी प्रतीक्षा कालावधी तीन ते पाच महिन्यांपर्यंत असू शकतो.
प्रतीक्षा कालावधी कारनुसार बदलतो. काही शहरात एखादी विशिष्ट कार पटकन विकत घेता येते, तर काही शहरात त्याच कारसाठी थांबावे लागते. देशातील प्रत्येक कारसाठी, प्रत्येक शहर आणि त्याच्या प्रकारानुसार प्रतीक्षा कालावधी भिन्न आहे.