Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कायदेशीर वारसदाराने मृत व्यक्तीचे रिटर्न कसे फाईल करावे?

ITR for Deceased Person

ITR for Deceased Person: एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (Income Tax Return File) करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून या तारखेनंतर तुम्ही रिटर्न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. हा नियम सर्वांना समान पातळीवर लागू आहे. म्हणजे एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.


इन्कम टॅक्स कायद्यात नमूद केल्यानुसार, मृत व्यक्तीचे रिटर्न भरण्यासाठी त्याचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे. न्यायालयीन प्रक्रियेनुसार मृत व्यक्तीने ज्याला वारसदार नेमलं आहे. तोच मृत व्यक्तीचे रिटर्न फाईल (ITR for Deceased Person) करू शकतो. ही प्रक्रिया पार पाडताना वारसदाराला काही अधिकार प्राप्त झालेले असतात. त्या अधिकारांतर्गत मृत व्यक्ती ई-फायलिंग करताना वारसदाराला मृत व्यक्तीच्या आणि स्वत:च्या पॅनकार्डची माहिती द्यावी लागते. एखाद्या वेळेस मृत व्यक्तीचा पॅन क्रमांक इन्कम टॅक्स विभागाकडे नोंद झालेला नसेल तर त्याऐवजी वारसदाराचा पॅन नंबर नोंदवावा लागतो. 

कायदेशीर वारसदार म्हणून पोर्टलवर नोंद कशी करायची

  • कायदेशीर वारसदाराने इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर स्वत:च्या नावाने लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर My Account मध्ये Register as legal heir यावर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधिताकडे न्यायालयाकडून मिळालेली कायदेशीर वारस प्रमाणपत्राची कॉपी आवश्यक आहे.
  • Register as legal heir मध्ये कायदेशीर वारस म्हणून स्वतःची नोंदणी करा. इथे नोंदणी करताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, त्याचे पॅनकार्ड, वारसदाराचे पॅनकार्ड, कायदेशीर वारसदार म्हणून प्रमाणित केलेली न्यायालयाच्या आदेशाची प्रत अपलोड करा.
  • ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाला ही माहिती मिळते.

इन्कम टॅक्स विभागाकडून पडताळणी 

वारसदाराने दाखल केलेल्या माहितीची आणि कागदपत्रांची संबंधित विभागाकडून तपासणी व पडताळणी केली जाते. सबमिट केलेल्या माहिती आधारे विभाग सदर अर्ज योग्य असेल तर मान्य करतो किंवा त्यात काही त्रुटी असतील तो कारणासह फेटाळला जातो. त्याबाबतची सूचना संबंधित वारसदाराला पाठवली जाते. योग्य अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर वारसदार इतरांप्रमाणे मृत व्यक्तीचे रिटर्न फाईल करू शकतो.

करदात्याच्या मृत्यूनंतर काही उत्पन्न आल्यास ते कायद्याने वारसदाराच्या उत्पन्नाचा भाग बनते. वारसदाराला हे उत्पन्न आपल्या रिटर्नमध्ये समाविष्ट करावे लागते. त्यामुळे आयटीआर भरण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या एकूण उत्पन्नाची नोंद ठेवणं गरजेचं आहे.