Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फ्री-लान्सरने आयटीआर (ITR) कसा फाईल करावा?

फ्री-लान्सरने आयटीआर (ITR) कसा फाईल करावा?

फ्री-लान्सर (Free-Lancer) किंवा प्रोजेक्टनुसार काम करणाऱ्यांसाठी रिटर्न फाईल करणं ही प्रक्रिया थोडी गुंतागुतीची वाटू शकते. कारण त्यांच्याकडे विविध स्त्रोतांमधून उत्पन्न येत असते आणि त्यांचे एकापेक्षा अधिक क्लायंट असू शकतात.

नोकरदार किंवा पगारदार व्यक्तींची इन्कम टॅक्स (Income Tax) भरण्याची वेळ येते; तेव्हा ती तुलनेने सोपी असते. कारण कंपनीच्या एचआर (HR) विभागाकडून फॉर्म 16 (Form 16) बरोबरच, रिमाइंडर, टॅक्स भरण्याची मुदत आणि टॅक्स सवलतीच्या विविध उपाययोजनांची माहितीही मिळते. पण फ्री-लान्सर (Free-Lancer) किंवा प्रोजेक्टनुसार काम करणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया थोडी गुंतागुतीची वाटू शकते. कारण त्यांच्याकडे विविध स्त्रोतांमधून उत्पन्न येत असते आणि त्यांचे एकापेक्षा अधिक क्लायंट असू शकतात. तर आज आपण फ्री-लान्सर म्हणून काम करणाऱ्यांसाठी आयटीआर रिटर्न (Income Tax Return-ITR) भरण्याची प्रक्रिया आणि कोणता आयटीआर फॉर्म (ITR Form) भरणे योग्य ठरू शकते, याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.


 जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या अंगभूत कौशल्यातून किंवा बुद्धिमत्तेच्या बळावर पैसे मिळवत असतो. तेव्हा त्याचे उत्पन्न व्यवसाय व उद्योगातील नफा या घटका अंतर्गत येतं. अशाप्रकारे उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींनी कराच्या (Tax) दृष्टिकोनातून स्वत:ला एक व्यावसायिक म्हणून विचार केला पाहिजे. एखाद्या व्यवसायात ज्या पद्धतीने ग्राहक असतात. त्यानुसार फ्री-लान्सरकडे अनेक ग्राहक असतात आणि त्यांना वेगवेगळ्या ग्राहकांकडून मिळालेल्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागतो.

बिलातून टीडीएस कपात

फ्री-लान्सरद्वारे दिली जाणारी प्रत्येक व्यावसायिक सेवा इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 194J अंतर्गात येते आणि त्यावर 10 टक्के टीडीएस (Tax Deduction at Source) आकारला जाऊ शकतो. पगारदार व्यक्तींप्रमाणे फ्री-लान्सर टीडीएसच्या परताव्यासाठी (TDS Refund) दावा करू शकतात.

खर्चाचा दावा केल्याने करदायित्व कमी होते

आपला टॅक्स कमीतकमी कापला जावा यासाठी फ्री-लान्सर कामावर केलेल्या खर्चाचा दावा करून शकतात. म्हणजे त्यांनी सदर कामासाठी कोणताही खर्च केला असेल जसे की, नवीन लॅपटॉप, प्रिंटर, लेखनाचे साहित्य, प्रवास खर्च, खाण्या-पिण्यावर झालेला खर्च, कामानिमित्त विकत घेतलेली पुस्तके, दुरूस्ती, जागेचे भाडे अशा सर्व खर्चांचा दावा केला जाऊ शकतो.

फ्री-लान्सरला कोणता फॉर्म लागू होतो?

फ्री-लान्सर आणि कन्सलटन्ट यांनी इन्कम टॅक्स रिटर्न करताना आयटीआर-3 किंवा आयटीआर-4 (ITR-3 or ITR-4) हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. आयटीआर-3 फॉर्म हा व्यवसाय-उद्योग किंवा प्रोफेशनल सेवांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर लागू होतो. आर्थिक वर्ष 2016-17 पासून व्यावसायिक, प्रोफेशनल संभाव्य टॅक्स आकारणीचा पर्याय निवडू शकतात आणि आयटीआर-4 हा फॉर्म दाखल करून त्यांच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के उत्पन्न घोषित करू शकतात.