कोरोना साथीचा प्रसार झाल्यानंतर जगभरामध्ये सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोविड निर्बंधामुळे हॉलेट , ट्रॅव्हल , पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. काही कंपन्यांनी नोकर कपात केली तर काहींना व्यवसाय बंद करावा लागला होता. मात्र , नवीन वर्षात देशांतर्गत सेवा क्षेत्राला चांगले दिवस येतील , असा अंदाज वर्तवला जात आहे. भारताकडे 2023 वर्षासाठी जी- 20 परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळेही सेवा क्षेत्राला फायदा होणार आहे.
परदेशी पर्यटक वाढतील
देशांतर्गत प्रवास पुढील वर्षात वाढेल तसेच त्यापुढील वर्षातही वाढ होतच राहील. आंतरराष्ट्रीय पर्यटकही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येतील. मात्र , हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च वाढणार वाढेल. कारण , मागणी आणि पुरवठा यामध्ये सेवा क्षेत्राचा ताळमेळ राहण्याची शक्यता कमी आहे , अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे व्यवसायावर झालेला परिणाम 2022 - 23 वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कमी झाला आहे. हॉटेलमधील 70 टक्के खोल्या बुक होतात. तसेच दरदिवशीचे सर्वसाधारण भाडे साडेसहा हजारांपासून सात हजाराच्या पुढे गेले आहे. २०२२ वर्षात सेवा क्षेत्राला उभारी मिळाली. मात्र , 2023 वर्षात हे क्षेत्र उच्चांकी गाठेल असे मत सेवा क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
G 20 परिषदमुळे सेवा क्षेत्राला फायदा
2023 वर्षीसाठी जी- 20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. या वर्षभरात परिषदेच्या दीडशेपेक्षा जास्त बैठका भारतात होणार आहेत. या बैठकांसाठी समूह देशांचे प्रतिनिधी , माध्यम प्रतिनिधी , सरकारी अधिकारी , विविध जागतिक स्तरांवरील संघटनांचे अधिकारी हजेरी लावणार आहेत. यातील बहुतांश बैठका , परिषदा आलिशान हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो शहरातील हॉटेल्सला याचा फायदा होणार आहे. यातील बहुतांश प्रतिनिधी परदेशातून येणार असल्याने ट्रॅव्हल इंडस्ट्रीही तेजीत राहील.
थिंक टँक , महिला परिषद , युथ परिषद यांसारख्या अनेक परिषदा आणि आरोग्य , कामगार , अर्थ , पर्यावरण , शिक्षण , ऊर्जा , वातावरण बदल , साथीचे आजार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विविध बैठका होणार आहेत. ' वसुवैध कुटुंम्बकम ' ही पुढील वर्षाचे जी-20 परिषदेचे ब्रीदवाक्य असणार आहे. युक्रेन युद्ध , मंदी या विषयांवरही बैठका होतील.