Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Alphanso Mango : बाजारात हापूस आंब्याची एन्ट्री! जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार

Hapus Mango

Image Source : www.foodtechbiz.com

कोकणातील हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. मुंबईकर असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणचा ग्राहक, प्रत्येकजण बाजारात हापूस कधी दाखल होणार? याची वाट पाहत असतो. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC Market) आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या हापूस आंब्यासाठी किती किंमत मोजावी लागणार? ते आज आपण जाणून घेऊया.

कोकणातील हापूस आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. मुंबईकर असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणचा ग्राहक, प्रत्येकजण बाजारात हापूस कधी दाखल होणार? याची वाट पाहत असतो. हापूसची वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC Market) आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच सर्वांना हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे. पण या हापूस आंब्यासाठी किती किंमत मोजावी लागणार? ते आज आपण जाणून घेऊया.

एपीएमसी मार्केटमध्ये 38 पेट्या दाखल

वारी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याच्या म्हणजेच अल्फान्सोच्या 38 पेट्या विक्रीसाठी आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात कमी संख्येने हापूस आंब्याच्या पेट्या येत होत्या. यंदा हापूस आंबा खाण्यासाठी तुमचा खिसा अधिक रिकामा होऊ शकतो. वाढत्या महागाईबरोबरच यावेळी आंब्याचे दरही वाढले आहेत.

दर जाणून घ्या

या हंगामात हापूसची आवक अधिक झाली आहे. बाजारात आंब्याची आतापर्यंतची ही सर्वोत्तम आवक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन डझन हापूसच्या पेट्या बाजारात आल्या होत्या. त्यावेळी दोन डझनाचा भाव नऊ हजार रुपये होता. गुरुवारी आवक झालेल्या चार ते आठ डझन हापूसच्या पेट्यांचा बाजारभाव 5 हजार ते 10 हजार रुपये, तर पिकलेल्या हापूसच्या पेट्यांची 12 हजार ते 15 हजार रुपये दराने विक्री होत आहे.

असा ओळखा हापूस आंबा

हापूस इतर आंब्यांपेक्षा वेगळा आहे कारण तुम्ही हापूस आंबा त्याच्या सुगंधावरून ओळखू शकता. त्याचा रंग आणि चव इतर आंब्यांपेक्षा वेगळी असते. हापूस आहे की नाही हे अनेकांना एका नजरेत ओळखता येतं. हापूस आंबा अधिक रसाळ असतो आणि त्याची त्वचा पातळ पण टणक असते. त्याचा रंग केशरी पिवळा असतो. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरीने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये हापूसच्या नावावर भौगोलिक संकेत (जीआय) प्राप्त झाले आहेत. या जिल्ह्यांत पिकवल्या जाणाऱ्या आंब्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणचे आंबे आणि आंब्याचे उत्पादन हापूसच्या नावाने सांगता येत नाही. कोकणातील हापूसची चव, रंग, पोषण इत्यादी भिन्न आहेत. हापूस आंबा फक्त कोकणातच तयार होतो त्यामुळे इतर कोणीही त्याची कॉपी करू शकत नाही आणि कोणाशीही स्पर्धा करू शकत नाही.