Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सैन्यातील नोकरीसाठी सरकारची 'अग्निपथ' योजना

Agnipath scheme bihar protest

योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी

देशातील तरुणांना सैन्यात सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून ‘अग्निपथ’ योजनेची (Agneepath Scheme Indian Army) घोषणा केली आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (14 जून) पत्रकार परिषदेत अग्निपथ योजनेची घोषणा केली. तसंच, या योजनेबाबत सविस्तर माहितीही दिली. योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा करण्याची संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य, अनुभव यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते.

या योजने अंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या ‘अग्निवीरां’ना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन (Agneepath Scheme Salary) आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल. पुढच्या 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती (Agneepath Recruitment Scheme 2022) सुरू होईल. 

योजनेची वैशिष्ट्ये 

agnipath scheme

  • वय वर्षे 17 ते 21 दरम्यानच्या तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती होता येईल.
  • या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 30 हजार रुपये, तर चौथ्या वर्षीपर्यंत यात वाढ होऊन 40 हजार रुपये वेतन मिळेल.
  • अपघात किंवा शाहिद झाल्यास विम्याची मदत दिली जाईल, तसंच कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी दिला जाईल.

या योजनेमुळे 17 ते 21 वयोगटातील तरुणांना (Agneepath Scheme Age Eligibility) सैन्यात सेवा देण्याची संधी मिळत आहे. यातून या तरुणांना  शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास, मानसिक विकास, टीम बिल्डिंग आणि शिस्त अशा विविध गोष्टी या चार वर्षात आत्मसात करता येतील अशी अपेक्षा  सैन्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.