• 02 Oct, 2022 09:02

दीड वर्षांत 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधानांची घोषणा!

PM NARENDRA MODI ON GOVERNMENT JOB

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील कर्मचारी पदांचा आढावा घेतला आहे. सरकारने येत्या 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.

सुशिक्षित बेरोजगार आणि एकूणच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरद्वारे आनंदाची बातमी दिली आहे. मंगळवारी (दि. 14 जून रोजी) पीएमओ कार्यालयाकडून सरकार येत्या 1.5 वर्षात 10 लाख लोकांची भरती करेल, असे ट्विटरद्वारे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून (PMO) करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील कर्मचारी पदांचा आढावा घेतला आहे. सरकारने येत्या 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. रोजगाराच्या शोधात असलेले आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरूणांसाठी ही मोठी बातमी आहे. 

गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचा दर मंदावला. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या आहेत. सरकारनेही गेल्या काही वर्षांत पदभरती केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केलेली ही घोषणा महत्त्वाची आहे. सरकारने अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तरांच्या काळात विविध विभागातील रिक्त पदांचा आकडा जाहीर केला आहे. सरकारी कार्यालयातील सुमारे 8 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने रिक्त पदांचा मुद्दा निकालात काढण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत?

Central Govt Vacant Post

नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (मार्च, 2022) लोकसभेमध्ये केंद्राच्या विविध विभाग व मंत्रालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उत्तर देताना 1 मार्च, 2020 अनुसार विभागनिहाय मंजूर आणि भरलेल्या पदांची यादी दिली आहे. या यादीनुसार, 77 विभागांमधून 41,04,941 पदे मंजूर असून त्यातील 31,25,550 पदे भरलेली आहेत. म्हणजे या आकडेवारीनुसार अजून 9,79,391 पदे रिक्त आहेत. सरकारी यंत्रणेतील पोस्ट ऑफिस, संरक्षण मंत्रालय, रेल्वे आणि महसूल या विभागातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. रेल्वे विभागातील 15 लाख मंजूर जागांपैकी 2.3 लाख जागा रिक्त आहेत. संरक्षण मंत्रालायत मंजूर 6.33 लाख मंजूर पदांपैकी 2.5 लाख जागा रिक्त आहेत. पोस्ट ऑफिस विभागामध्ये 2.67 मंजूर जागांपैकी 90 हजार जागा रिक्त आहेत. तर महसूल विभागामध्ये 1.78 मंजूर जागांपैकी 74 हजार जागा रिक्त आहेत. 

IMAGE SOURCE - https://bit.ly/3NLvXZA