Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile Sim Card: तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डमध्ये सोनं दडलंय याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Mobile SIM

Mobile Sim Card News: मोबाईल सिमकार्ड बनवण्यासाठी त्यावर सोन्याच्या धातूचा मुलामा देण्यात येतो कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Mobile Sim Card News: हल्ली आपली सगळी कामे आपल्या स्मार्टफोनवरच(Smartphone) होत आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीची इमर्जन्सी लागली नंतर तर लगेच तातडीने फोन लावतो. भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या(Telecom Company) आहेत ज्यांचे सिमकार्ड आपण वापरतो. जी कंपनी चांगल्यातील चांगला प्लॅन ग्राहकांना देते त्याचेच सिम कार्ड ग्राहक वापरतात. पण याच सिमकार्ड(Sim card) बद्दल एक गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डमध्ये सोनं(Gold) दडलंय याबद्दल तुम्हाला माहितीये का? चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

म्हणून सिमकार्डवर देतात सोन्याचा मुलामा

तुमच्या फोनमध्ये असणारे सिमकार्ड तयार करण्यासाठी सोन्याच्या(Gold) धातूचा वापर केला जातो. सिमकार्डवर असणाऱ्या चिपवर सोन्याचा थर देण्यात आलेला असतो. सोने हे उत्तम विजेचे वाहक आहे, चांदी किंवा इतर धातूच्या तुलनेत सोनं लवकर खराब होत नाही म्हणून सिम कार्डवर(Sim Card) सोन्याचा मुलामा देण्यात येतो. मात्र हे सिमकार्ड खराब झाल्यानंतर त्यावरील सोने काढता येऊ शकत नाही, याउलट सोने पुन्हा वापरण्याऐवजी ई-वेस्ट लँडफिलमध्ये(e-waste landfill) त्याचे रूपांतर करण्यात येते. त्यामागचे कारण असे आहे की, सिमकार्डमधून सोने वेगळे करण्यासाठी अजून कोणतीही उपाययोजना भारतात तयार करण्यात झालेली नाही. 

एका डिजिटल ट्रेंडच्या अहवालानुसार सिमकार्डमधून सोने बाजूला काढण्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च येतो असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र इंपिरिअल कॉलेज लंडन(Imperial College London) यांनी सिमकार्डमधून सोने वेगळे काढण्याची पद्धत तयार केली आहे.
सिमकार्डमधून समजा सोने बाजूला काढलेच तरीही त्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही. त्यापेक्षा सिमकार्डच्या ई-कचऱ्याची(e-waste) विल्हेवाट लावणे अधिक सोपे असते. समजा सिमकार्डमधून सोने काढलेच तर , खाणीतून सोने काढल्यावर होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी मदत होऊ शकते.