Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Telecom Company Prepaid Plan: गेल्या तीन वर्षात टेलिकॉम कंपन्यांच्या प्रिपेड प्लॅनमध्ये झालेले बदल, जाणून घ्या

Telecom Company Prepaid Plan

Telecom Company Prepaid Plan: दूरसंचार कंपन्या ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लॅन महाग करून दरवर्षी ग्राहकांना धक्का देतात. ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. गेल्या वर्षाच्या अखेरीस दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड रिचार्ज प्लॅन 500 रुपयांनी वाढवले होते, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

दूरसंचार कंपन्या ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लॅन महाग करून दरवर्षी ग्राहकांना धक्का देतात. ग्राहकांना  प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. गेल्या वर्षाच्या अखेरीस दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड रिचार्ज प्लॅन 500 रुपयांनी वाढवले होते. अलिकडे, एअरटेलने काही मंडळांमध्ये किमान रिचार्ज योजना महाग केल्या आहेत. जिओने आपल्या पोर्टफोलिओमधून अनेक योजना काढून टाकल्या आहेत. याच प्रकारचे गेल्या दोन वर्षात कसे बदल घडून आले हे जाणून घेऊया.

टेलिकॉम कंपन्यांनी केलेले बदल (Changes made by Telecom Companies)

काही वर्षापूर्वी सर्व कंपनीचे सिम कार्ड हे रीचार्ज न करता सुद्धा चालू राहत होते. ज्या लोकांना सर्वाधिक गरज होती असेच लोक डेली रीचार्ज करत होते. 3 वर्षा आधी सर्व कंपन्यांनी नियम लागू केला की, सिम कार्डमध्ये जर सलग तीन महीने रीचार्ज केले नाही तर सिम कार्ड बंद होईल. आउटगोइंग कॉल सोबत इनकमिंग कॉल (Outgoing calls Incoming calls) सुद्धा बंद करण्यात येते. 2016 मध्ये जिओ लाँच झाल्यापासून अनेकांच्या रीचार्जची चिंता मिटली होती, कारण 100 रुपयामध्ये 28 दिवसासाठी अनलिमिटेड कॉल (Unlimited calls)असे ऑफर त्यावेळी होते. या ऑफरला लक्षात घेऊन जिओ कंपनीचे ग्राहक वाढले. गेल्या तीन वर्षात टेलिकॉम सेक्टर मध्ये असे काही बदल घडून आले की, सर्वच कंपन्यांनी आपल्या प्रिपेड प्लॅनमध्ये वाढ केली. टेलिकॉम कंपनीच्या प्रिपेड प्लॅनमध्ये कितीने वाढ झाली हे जाणून घेऊया.

मागील 3 वर्षातील वार्षिक प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan for Last 3 years)

टेलिकॉम कंपनी 

2019 प्रिपेड प्लॅन 

2020 प्रिपेड प्लॅन 

2021 प्रिपेड प्लॅन 

जिओ

2199

2545

2999

एयरटेल

2199

2398

2999

  बीएसएनएल

2299

2599

2999

 वोडाफोन आयडिया 

1999

2499

2899

अजूनही महाग होणार प्रीपेड प्लॅन (Prepaid Plans will still be Expensive)

जिओने डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह (Disney Plus Hotstar Subscription)सर्व रिचार्ज योजना काढून टाकल्या आहेत. दुसरीकडे, एअरटेलने दोन योजना वगळता सर्व प्लॅनमधून हे फायदे काढून टाकले आहेत. म्हणजेच, पूर्वीप्रमाणेच रक्कम भरल्यास ग्राहकांना कमी फायदे मिळतील. डिस्ने हॉटस्टार योजना काढून टाकण्याचे जिओचे स्वतःचे कारण असू शकते. यावेळी फिफा विश्वचषक भारतात फक्त जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीम केला जात आहे, अशा प्रकारे कंपनी आपले OTT प्लॅटफॉर्म सेट करत आहे. त्यामुळे प्लॅन महागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

मागील वर्षा अखेरीस प्लॅनमध्ये वाढ (Increase in the plan at the end of last Year)

गेल्या वर्षी देखील रिचार्ज प्लॅन महाग करण्यात आला होता,  वर्षाच्या अखेरीसही टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. एअरटेलने त्यावेळी आपल्या किमान रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 79 रुपयांवरून 99 रुपये केली होती. जिओने आपला रिचार्ज प्लानही लॉन्च केला आहे. जर एखाद्या टेलिकॉम कंपनीने रिचार्ज प्लॅन महाग केला असेल तर इतर ऑपरेटर नक्कीच त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग करतील. त्याच वेळी, 5G नेटवर्क पूर्ण लॉन्च झाल्यानंतर, रिचार्ज योजना नक्कीच महाग होणार आहेत. टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) काही सर्कलमध्ये त्यांचे प्लान महाग करू शकतात अशी अपेक्षा आहे