Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Bank Information Safe About Tips: मोबाईल चोरीला गेला तर बॅंकेची ऑनलाईन माहिती 'अशी' ठेवा सुरक्षित

Online Safe Banking information

If The Mobile Phone is Stolen, Keep the Online Bank Information Safe: सध्या डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटसंबंधी फोन पे, गुगल पे असे अनेक अॅप्स प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे समजाच एखादया वेळी जर मोबाईल चोरीला गेला किंवा हरविला तर मोबाईलमधील बॅंकेची ऑनलाईन माहिती कशी सुरक्षित ठेवायची, याबाबतीत अधिक जाणून घेवुयात.

If The Mobile Phone is Stolen, Keep the Online Bank Information Safe: जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्हाला डिजिटल पेमेंटसंबंधी मनात भिती असते. कारण तुमचा संपूर्ण बॅंकेचा व्यवहार ऑनलाईन असतो. जर असे काही घडलेच, तर अशा परिस्थितीत हताश होऊ नका. यासंबंधी आम्ही खाली काही गोष्टींची माहिती देत आहोत, तशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

फोनला नेहमी लॉक ठेवा (Always keep the Phone Locked)

मोबाईलला नेहमी लाक असावा. यामध्ये अँड्रॉइड किंवा आयओएसचा वापर करत असाल, तर त्याला पॅटर्न, फेस लॉक किंवा पासवर्ड ठेवणे गरज बनली आहे. कारण समजा तुमचा अँड्रॉइड फोन हरवला तर तुम्ही तो अँड्रॉइड डिव्हाईस मॅनेजरचा वापर करून किंवा गुगल आयडीच्या मदतीने पुन्हा मिळवू शकता. आयओएस प्रकारचा मोबाईल असेल तर तो तुम्ही Find my iphone पर्यायावर क्लिक करून मोबाईल शोधून काढू शकता. 

बँकेला माहिती द्या (Inform The Bank)

सर्वप्रथम मोबाईल हरविला, तर त्वरित बॅंकेत जाऊन नेटबँकिंग सुविधा तात्पुरती बंद करावी किंवा नेटबँकिंगचा पासवर्ड बदलून टाकावा. बॅंकेला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे होणारे सर्व व्यवहार थांबविण्यास सांगणे. शक्यतो, मोबाईलच्या मागे डेबिट, क्रेडिट कार्ड ठेवण्याची सवय असेल तर ती त्वरित थांबवा. कारण मोबाईल हरविला तर मोबाईलसोबतच कार्डदेखील जाईन आणि अशा वेळी मोबाईलवर ओटीपी गेल्यास मोबाईल चोरणाऱ्याला सहज पैस चोरी करणे शक्य होते. 

पोलिसात तक्रार करा (Report to The Police) 

मोबाईल हरविल्यास तुमच्या जवळच्या पोलिस चौकीत तक्रार करा. फोन खरेदीवेळी विमा काढला असेल, तर त्वरित त्या विमा कंपनीला माहिती द्या. तुम्ही पोलीस चौकीत प्रत्यक्षात न जाताही ऑनलाईन माध्यमातून मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल करू शकता. 

सिमकार्ड बंद करावे (Turn Off the SIM Card)

तुमचा मोबाईल चोरीला गेला की, तो मिळण्याची शक्यता नसेल, तर सिम कार्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमचे सिम कार्ड बंद करावे. कारण तुमच्या सिम कार्डचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते. बँक अकाउंटला मोबाईल नंबर जोडलेला असल्याने फोन चोरी करणारा त्यावर ओटीपी पाठवून पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सीम कार्ड बंद करणे आवश्यक आहे.