Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गोल्ड कॉईन की गोल्ड बार... काय खरेदी करावं?

gold investment

भारतात सर्रास सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) केली जाते. सोन्याचा वापर दागिने, नाणी किंवा बिस्किटे अशा प्रत्येक स्वरूपात केला जातो. आज आपण सोन्याचे नाणे (Gold Coin) आणि सोन्याची पट्टी (Gold Bar) यांच्यातील फरक समजून घेणार आहोत.

भारतात सर्रास सोन्यामध्ये गुंतवणूक (Gold Investment) केली जाते. सोन्याचा वापर दागिने, नाणी किंवा बिस्किटे अशा प्रत्येक स्वरूपात केला जातो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतात प्रत्येक विशेष प्रसंगी किंवा सणासुदीला आवर्जुन सोन्याची खरेदी केली जाते. सोन्याची खरेदी करताना विक्रेत्यांकडून किंवा सोनाराकडून लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी भारत सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) या संस्थेची स्थापना केली आहे. आज आपण सोन्याचे नाणे (Gold Coin) म्हणजे काय? सोन्याचा बार (Gold Bar) म्हणजे काय? आणि त्याचे फायदे-तोटे यांची माहिती घेणार आहोत.

सोन्याचं नाणं म्हणजे काय? What is a Gold Coin?

सोन्याचं नाणं म्हणजे सोन्याच्या धातूपासून बनवलेले नाणे. सोनं हा मौल्यवान धातू आहे. इतिहासाचा विचार करता 1800 पासून सोन्याची नाणी बनवली व वापरली जात आहेत. या नाण्यांमध्ये 90 ते 92 टक्के सोनं (22 कॅरेट) असतं. आता शुद्ध (24 कॅरेट) सोन्याची नाणी ही तयार केली जातात. सोन्याच्या नाण्यांसोबत अतिरिक्त प्रीमियम जोडलेला असतो. कारण सोन्याचं नाणं हे कायदेशीर चलन म्हणून वापरलं जाऊ शकतं. शिवाय, अनेक लोक सोनं या धातूबद्दल भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. त्याचं इतिहासातील किंवा धर्मातील महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा सोन्याची वस्तू धारण करण्यासाठी इच्छुक असतात.

भारतात 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅम वजनापर्यंतची सोन्याची नाणी तयार केली जातात व ती खरेदीसाठी ही उपलब्ध असतात. गुंतवणूकदारांसाठी, दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी खरेदी करणं व ती बाळगणं सोपं ठरू शकतं. भारतात सोनं खरेदी करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, गुंतवणूकदार स्थानिक ज्वेलर्स, ऑनलाईन सोनं विक्रेते, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एमएमटीसी (Metals and Minerals Trading Corporation of India- MMTC), मुथूट फायनान्स आणि इतर अधिकृत विक्रेत्यांकडून सोनं खरेदी करू शकतात. तसेच, एका खरेदीदाराकडून खरेदी केलेले सोन्याचे नाणे त्याच खरेदीदाराला पुन्हा विकता येते. पण, विकताना त्याची किंमत कमी-जास्त असू शकते. कारण सोन्याचा दर दररोज बाजारभावानुसार कमी-जास्त होत असतो.

सोन्याचं नाणं खरेदी करण्याचे फायदे

वेगवेगळा आकार (Different Sizes)

सोन्याची नाणी वेगवेगळ्या आकारात, फिनिशिंग, डिझाईन्स, किंमत आणि सोन्याच्या शुद्धतेनुसार मिळतात. गुंतवणूकदार त्याच्या बजेटनुसार आणि वैयक्तिक आवडीनिवडी नुसार त्याची खरेदी करू शकतो.

हमी (Guarantee)

अनेकदा सरकारद्वारे सोन्याची नाणी काढली जातात; जी सोन्यामध्ये मिश्रित करण्यात आलेले इतर धातू, सोन्याची शुद्धता आणि डिझाईनची हमी देतात.

तरलता (Liquidity)

सोन्याच्या नाण्यांना लिक्विडिटी चांगली आहे; या नाण्यांनी बाजारात सहज व्यवहार करता येतो. सोन्याला संपूर्ण जगभरात मान्यता असून त्याची विक्री करणं अत्यंत सोपे आहे.

सुलभ विक्री (Easy Selling)

सोन्याची नाणी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना महागाईची चिंता करण्याची गरज नाही. तसेच सोन्याच्या नाण्याची विक्री होईपर्यंत भांडवली नफ्यावर कर भरण्याची ही गरज भासत नाही.

सोन्याचं नाणं खरेदी करण्याचे तोटे

उच्च किंमत (Higher Price)

सोन्याच्या नाण्याचे खरेदी मूल्य, त्याची हाताळणी, खरेदी-विक्री, त्याची कायदेशीर पत यामुळे इतर धातूंच्या किमतीपेक्षा सोन्याच्या नाण्याची किंमत थोडी जास्त आहे.

प्रीमियम (Premium)

सोन्याची नाणी तयार करण्यासाठी, त्याचं डिझाईन बनवण्यासाठी उत्पादन खर्च अधिक असल्याने त्याचा प्रीमियम इतरांच्या तुलनेत अधिक आहे.

सोन्याची पट्टी म्हणजे काय? What is a Gold Bar?

सोन्याच्या पट्ट्या/बार या शुद्ध सोन्याच्या असतात. सरकारी किंवा खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या उत्पादकांद्वारे याची निर्मिती केली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या उत्पादन आणि लेबलिंगच्या मानक अटी पूर्ण करतात. वितळलेले सोने एका पट्टीच्या आकाराच्या साच्यात ओतून त्याच्या सोन्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. मध्यवर्ती व इतर महत्त्वाच्या बँका सोन्याचा साठा पट्ट्यांच्या स्वरूपात करून ठेवतात.

सोन्याच्या पट्ट्या 24 कॅरेट (999.9 शुद्ध सोने) मध्ये तयार केल्या जातात. त्याचे वजन, शुद्धता आणि सुवर्ण मानकांची हमी देणारे प्रमाणपत्र त्याला दिले जाते. म्हणून, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा किफायतशीर मार्ग म्हणून सोन्याची पट्टी/बार विकत घेणं मानलं जातं.

सोन्याची पट्टी खरेदी करण्याचे फायदे

विविध आकार (Different sizes)

सोन्याचे बार 1 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत विविध आकारात उपलब्ध आहेत. म्हणून, ते कोणत्याही गुंतवणूकदाराच्या बजेटसाठी योग्य आहेत.

मानकीकृत (Standardised)

सोन्याच्या गुंतवणुकीसाठी गोल्ड बार हे एक मानक आहे. हे जगभरातील कोणत्याही सराफा विक्रेत्यास अदलाबदल करण्यायोग्य आहे.

दीर्घ मुदतीची गुंतवणूक (Long Term Investment)

गुंतवणूकदाराचा तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधून सोन्याच्या बारांची विक्री करण्याचा कोणताही हेतू नसल्यास दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे आदर्श आहे.

कमी किंमत (Lower Price)

सोन्याच्या नाण्यांपेक्षा सोन्याच्या पट्ट्या स्वस्त आहेत कारण ते उत्पादनासाठी स्वस्त आहेत. उदाहरणार्थ, मोठ्या सोन्याच्या पट्टीचा उत्पादन खर्च लहान सोन्याच्या पट्टीपेक्षा कमी असेल.

सोन्याची पट्टी खरेदी करण्याचे तोटे

लवचिकता (Flexibility)

मोठ्या सोन्याच्या पट्ट्यांमध्ये (Gold Bar) लवचिकता नसते. त्यामुळे त्या वितळवणे आणि त्यांना आकार देणे कठीण होते. तसेच, जेव्हा या गोल्ड बारची पुन्हा विक्री केली असता त्यावर अतिरिक्त हाताळणी शुल्क आकारले जाऊ शकते.

प्रीमियम (Premium)

सोन्यावरील प्रीमियम नेहमीच वाढत असतो आणि त्यामुळे त्याचे मूल्यही वाढत असते. या सोन्याच्या पट्ट्यांची अचूक किंमत बाजारातील अनेक घटकांवर अवलंबून असते.

Presentation12

सोन्यामधील गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना बहुतांशवेळा फायदा देणारी गुंतवणूक मानली जाते. गुंतवणूकदार त्यांच्या पसंतीनुसार किंवा उपलब्ध परिस्थितीनुसार सोन्याची नाणी (Gold Coin) किंवा सोन्याचे बार (Gold Bar) खरेदी करू शकतात.