सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून नेहमीच पसंती दिली जाते. पण गेल्या काही दिवसांत जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे भाव वधारलेले होते. पण सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत सुधारणा होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव सोमवारी (दि. 9 मे) स्थिर राहिले आहेत. आज बाजारात 10 ग्रॅमच्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 47 हजार 500 रूपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51 हजार 710 रूपये आहे. तर चांदी 62 हजार 500 रूपये प्रति किलोने विकली जात आहे.
आजचा सोन्या-चांदीचा भाव काय आहे?
गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार 9 मे रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,810 प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 62,500 रूपये, चेन्नईत 66,700 रूपये, दिल्ली 62,500 रूपये आणि कोलकोतामध्ये 62,500 रूपये भाव आहे.
स्त्रोत : https://www.goodreturns.in/gold-rates/
22 व 24 कॅरेटमधील फरक
24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्ध असतं, असं म्हटलं जातं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त अशा धातुंचा 9 टक्के वापर करुन दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोनं शुद्ध असले तरी, फक्त सोन्याच्या धातूपासून दागिने बनवता येत नाहीत. शुद्ध सोन्यापासून दागिने तयार करण्यासाठी सुद्धा त्यात इतर धातू मिश्रित करावे लागतात. तरीही 24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोनं म्हटलं जातं. 24 आणि 22 कॅरेट सोन्याबरोबरच बाजारात 21, 18 आणि 17 कॅरेटचं सोनंही उपलब्ध असतं. प्रत्येक कॅरेटच्या सोन्यावर त्याच्या शुद्धतेविषयी लिहिलेलं असते. जसे की, 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875, 18 कॅरेट सोन्यावर 750 आणि 14 कॅरेट सोन्यावर 585 असं लिहिलेलं असतं.