मुंबई टू गोवा जाण्यासाठी आता आणखी एक पर्याय मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. मुंबई ते गोव्याचा प्रवास आता अधिक आरामशीर आणि किफायतशीर होणार आहे. दिनांक 3 जून 2023 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मुंबई- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते, मात्र ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून केले जाणार होते.
या रेल्वेने सुमारे 7 तासांमध्ये मुंबईकरांना गोव्याला पोहोचता येणार आहे. सध्या गोव्याला जाण्यासाठी मुंबईकरांना भारतीय रेल्वे, बस, विमानप्रवास आणि खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत. आता वंदे भारत एक्सप्रेसमुळे आणखी एका पर्यायाचा उपयोग मुंबईकरांना घेता येणार आहे. ही ट्रेन मुंबईहून मडगावला जाताना दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या मार्गे धावेल.
गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडा
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) June 2, 2023
⁰मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास वंदे भारत रेल्वे सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल
?https://t.co/9Xq2S47Cf1#VandeBharat #Goa #Mumbai @PIB_Panaji @ddsahyadrinews
pic.twitter.com/n2N8pqRSfA
गोवा-मुंबई वंदे भारतच्या उद्घाटनानंतर देशातील एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या आता 19 होणार आहे. याआधी देशभरात पहिल्यापासून 18 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनच्या निमित्ताने देशाला 19 वी नवी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. मुंबईतून धावणारी ही चौथ्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत ट्रेन असणार आहे.
ट्रेनचे संभाव्य दर
सध्या बसने गोव्याला जाण्यासाठी 12 तासांचा प्रवास करावा लागतो तर साधारण एक्सप्रेस ट्रेनने प्रवास केल्यास सरासरी 9 तास लागतात. वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यानंतर सुमारे 7 तासांमध्ये मुंबईकरांना गोव्याला पोहोचता येणार आहे.
वंदे भारत ट्रेनच्या तिकीट दराबाबत रेल्वे प्रशासनाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एसी चेअर कारसाठी तिकीटाची किंमत ₹1,100- ₹1,500 च्या दरम्यान असू शकते तर एक्झिक्युटिव्ह क्लास श्रेणीसाठी तिकीटाची किंमत ₹2,000-₹2,500 च्या दरम्यान असू शकते असा अंदाज आहे.
ट्रेनची वेळ काय असेल?
गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण 8 डबे असतील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी ही ट्रेन खुली असेल आणी त्याचे आरक्षण देखील प्रवाशांना करता येणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. शुक्रवारी ही ट्रेन धावणार नाही याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मुंबई सीएसएमटीहून पहाटे 5.25 वाजता ही ट्रेन निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीचा प्रवास जर करायचा असेल तर दुपारी 2.35वाजता मडगाव स्टेशनहून ही ट्रेन निघेल आणि रात्री 10.25 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.