Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bio Fuel: कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी, बायोइंधन निर्मिती, वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

Fuel generation from biomass

Bio Fuel: बायो सीएनजी इंजिनाबाबत भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी नुकताच एक उपाय सांगितला आहे. 5 टन तांदळाच्या भुसापासून एक टन बायो-सीएनजी मिळू शकतो, असे म्हणाले. हे केवळ खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर नाही, तर डिझेलपेक्षा कमी प्रदूषण करणारा पर्याय आहे. तसेच शेतकऱ्यांना याद्वारे कमाई सुरू होऊ शकते, जेणेकरून त्यांच्याकडे मिळकतीचा एक नवा मार्ग तयार होईल.

Fuel generation from biomass: रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीबाबत नुकतेच मोठे विधान केले आहे. ते एका कार्यक्रमात म्हणाले की, शेतकरी बायोमास वापरून ग्रीन हायड्रोजन तयार करू शकतात. हे हेवी ड्युटी बस आणि ट्रकमध्ये इंधन म्हणून पुरवले जाऊ शकते. शेतकऱ्यांसाठी ते म्हणाले की फ्लेक्स इंजिन जे 100 टक्के इथेनॉल किंवा पेट्रोलवर चालू शकतात. हे कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

बायो सीएनजी इंजिनाबाबतही गडकरींनी उपाय सांगितला आहे की, 5 टन तांदळाच्या भुसापासून एक टन बायो-सीएनजी मिळू शकते. हे केवळ खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर नाही, तर डिझेलपेक्षा कमी प्रदूषण करणारा पर्याय आहे. याशिवाय, त्यांनी सांगितले की रशियन तंत्राद्वारे त्यांनी इथेनॉलपासून पेट्रोलच्या बरोबरीने मायलेज देण्यात यश मिळवले आहे.

शेतातील बायोमासपासून इंधर निर्मितीचे अनेक प्रयोग यापूर्वीही झाले, मात्र त्यामुळे गाड्या व्यवस्थित चालत नसल्याचे लक्षात आले होते. मात्र आता यात अनेक बदल करत - करत वाहनास योग्य इंधन बनवले जात आहे. सध्या युनायटेड स्टेट्समध्ये, बायोमासपासून इंधन निर्माण करणे ही सामान्य गोष्ट आहे. लघु-स्तरीय बायोमास इलेक्ट्रिक प्लांट्सची किंमत प्रति किलोवॅट 3 हजाक ते 4 हजार युएल डॉलर आहे आणि 0.8 ते$0.15 युएस डॉलर प्रति किलोवॅट तास चालते.

ई-हायवेवर भर (Emphasis on e-highway)

लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस, ट्रक, ट्रॉली, बसचा वापर करण्यासाठी दिल्ली-जयपूर ई-हायवेला खाजगी पायलट प्रोजेक्ट बनवण्याच्या योजनांबद्दलही गडकरी बोलले. नवीन नियमानुसार 1 एप्रिलनंतर संपूर्ण भारतात 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची 9 लाख वाहने अनिवार्यपणे जंक बनतील. 9 लाख जुनी वाहने रस्त्यावरून हटवल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.