• 07 Dec, 2022 09:38

फुटबॉल प्रेक्षकांना GoSats App वर Bitcoin कमावण्याची ऑफर!

Bitcoin Football Fiesta

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ला सुरुवात झाली असून फुटबॉल प्रेमींसाठी Gosats App ने प्रेक्षकांसाठी बिटकॉईन कमावण्याची ऑफर आणली आहे.

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ला सुरुवात झाली आहे. फुटबॉल प्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे. फूटबॉलच्या प्रेक्षकांना या स्पर्धेच्या निमित्ताने बिटकॉईन कमावण्याची ऑफर  GoSats App ने दिली आहे. Gosats ने #BitcoinFootballFiesta सुरू केली आहे. GoSats प्लॅटफॉर्मच्या माहितीनुसार, Qatar FIFA World Cup 2022 च्या कालावधीमध्ये ही ऑफर दिली आहे. 20 नोव्हेंबरला सुरू झालेली ही स्पर्धा 18 डिसेंबरला संपणार आहे. याच कालावधीत बिटकॉईन मिळवण्याची संधी मिळणार आहे. 

या कालावधीत GoSats App च्या वापरकर्त्याना यामधील कॉन्टेस्टमध्ये बिटकॉईन स्टेक करण्याची संधी देण्यात येत आहे. यामध्ये 2 कॉँन्टेस्ट असणार आहेत. यातील पहिली कॉन्टेस्ट ‘प्रेडीक्ट अँड विन’ अशी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना प्रत्येक मॅचमधील विजेता कोण असेल याविषयी अंदाज लावायचा आहे. यातून सहभागींना बिटकॉईन जिंकण्याची संधी मिळणार आहे. एकूण 10 हजार satoshis अशी या कॉन्टेस्टमधील बक्षिसे आहेत. Satoshis हा बिटकॉईनचा लहान घटक आहे.

याव्यतिरिक्त स्पर्धेच्या कालावधीत पहिल्या तीन स्टॅकर्सना ‘स्टॅकर्स ऑफ द टूर्नामेंट’ (Stackers of the Tournament) स्पर्धेसह जॅकपॉट रिवॉर्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला किंवा स्पर्धेतील सर्वोच्च स्टॅकरला Apple iPhone 14 Pro Max असा रिवॉर्ड तर प्रथम उपविजेत्याला Apple iPad Air (फिफ्थ जनरेशन) आणि द्वितीय उपविजेत्याला एक Apple iPad Air मिळेल. #BitcoinFootballFiesta हा स्पर्धेच्या कालावधी दरम्यान म्हणजे जवळपास महिनाभर चालणार असल्याचे GoSats founder आणि सीईओ मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे Gosats App

GoSats हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले बिटकॉइन स्टॅकिंग अॅप आहे. बिटकॉइन स्टॅकिंग अॅप (Bitcoin Stacking App) वापरकर्त्यांना त्यांच्या भागीदार व्यापाऱ्यांसोबत खरेदी करताना बिटकॉइन कॅशबॅक मिळवण्याची संधी देते. 

कोण आहेत मोहम्मद रोशन?

मोहम्मद रोशन हे Gosats ते संस्थापक (founder) आहेत. कर्नाटकमधील बंगळुरु येथे ते वास्तव्यास आहेत. जानेवारी 2014 मध्ये  त्यांना बीटकॉईनचे महत्व पटले. तेव्हापासून ते बिटकॉईन  व्यवहारांशी संबंधित आहेत.  

भारतात गेल्या 7 वर्षांपासून ते ब्लॉकचेन/क्रिप्टो स्पेसमध्ये सक्रियपणे काम करत आहेत. Gosat मुळे ते प्रसिद्धीस आले आहेत. याचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) म्हणून देखील ते काम पाहतात.