Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Finance Minister Nirmala Sitharaman in Forbes list: फोर्ब्सच्या जागतिक शक्तीशाली महिलांच्या यादी निर्मला सीतारमण

Nirmala Sitharaman on Forbes list

Finance Minister Nirmala Sitharaman among Forbes World’s 100 Most Powerful Women: भारताच्या पहिल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौथ्यांदा जगतील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान पटकावले आहे. कोणत्या कारणांमुळे त्यांनी जगावर प्रभाव पाडला आहे, तसेच फोर्ब्सच्या यादीत नाव येणे एवढे महत्त्वाचे का आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी स्क्रोल डाऊन करून वाचा.

Nirmala Sitharaman stood at the 36th position: फोर्ब्सने नुकतीच जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी (world's 100 most powerful women 2022) जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी चौथ्यांदा स्थान मिळवले आहे. भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा देशावर तर प्रभाव आहेच, त्या अनेकांसठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे संपूर्ण देशावर परिणाम होतो. त्यांच्याकडे देशातले एक शक्तीशाली पद आहे. ज्यावरुन त्या देशाच्या प्रगतीसाठी काम करतात.

निर्मला सीतारमण 2019 साली देशाच्या अर्थमंत्री झाल्या. त्याच वर्षापासून फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकात त्यांचे नाव दरवर्षी येत आहे. 2019 साली जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत (world's 100 most powerful women 2022) त्यांचे नाव चौतिसाव्या स्थानावर होते. तर, 2020 साली हे स्थान घसरले आणि त्या एकेसाळिसाव्या क्रमांकावर विराजमान झाल्या. त्यानंतर 2021 मध्ये त्या 37 व्या क्रमांकावर होत्या. तर यावर्षी 2022 मध्ये त्या 36 व्या क्रमांकावर आहेत.

निर्मला सीतारमण यांना या यादीत स्थान का ? Why is Nirmala Sitharaman in this list?

या मासिकात आपल्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे नाव चौथ्यांदा आले आहे. ही भारतासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या प्रभाव भारतावरच नाही तर जगभरातील नागरिकांवर हे यातून दिसून येते. करोना उद्रेक झालेला त्यावेळी चीनसह इतर देशांमधील विद्यार्थी, इतर नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणले होते. तसेच रशिया - युक्रेन युद्धाच्यावेळी खास सुविधा तेथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या, त्यांना मायदेशी आणले. श्रीलंकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटात भारताने जमेल तेवढी शेजारी देशाला मदत केली. यासह जागतिक मंदी सुरू असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेचे कौतुल जगभरातील काही वृत्त संस्था करत आहेत, यात अर्थमंत्री सीतारमण यांचा उल्लेख आदी अनेक कारणांमुळे त्यांनी जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

फोर्ब्स मासिकातील रँकिंग का महत्त्वाचे आहे? Why is ranking in Forbes important?

1917 साली महायुद्ध सुरू असताना आर्थिक घडामोडींवर स्फूट लेखन करणारे आणि मूळचे स्कॉटलंडचे असलेले बी. सी. फोर्ब्स यांनी फोर्ब्स हे मासिक न्यू जर्सी, अमेरिका येथे सुरू केले. 1945 नंतर हे मासिक जगप्रसिद्ध झाले. यातील यशस्वी उद्योजकांच्या कथा, त्यांना दिले जाणारे रँकिंग यामुळे हे मासिक प्रसिद्ध झाले. यातील समीक्षणे, विश्लेषणे यांवर उद्योगजगतातील व्यक्तींमध्ये चर्चा होऊ लागले. हे मासिक विकत घेण्यासाठी तेव्हाचे अनेक अद्योजक सरसावले होते. जेणेकरून यात त्यांच्याच विषयी छापून यावे आणि यामुळे त्यांच्या उद्योगाला फायदा व्हावा. रँकिंगमुळे प्रसिद्ध झालेले मासिक आजही विविध क्षेत्रातील रँकिंग दरवर्षी प्रसिद्ध करते. हे रँकिंग काढण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रणाली बनवलेली आहे. यासाठी अनेक रिसर्चस त्यांच्यासाठी काम करतात. या यादीमुळे अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये चढ - उतारही होतो, सेलिब्रेटीजचे मानधनही वाढते, कंपन्यांमधील आंतरराष्ट्रीय करार यशस्वी होतात, अशी अनेक उदाहरणे वृत्तपत्रांमधून समोर आलेली आहेत. यामुळे या यादीत नाव येणे ही मानाची गोष्ट मानली जाते तसेच याचा त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होतो.