Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Haryana Govt. Scheme: ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये अनुदान, या तारखेपर्यंत अर्ज करा

Haryana Govt Scheme

Haryana Govt. Scheme: शेतीच्या कामात वापरण्यात येणारी यंत्रे व वाहने योग्य वेळेत उपलब्ध नसल्याने पेरणीपासून काढणीपर्यंतची कामे शेतकऱ्यांना वेळेत पूर्ण करता येत नाहीत.

Haryana Govt. Scheme: भारतात आजही 65 टक्के लोक शेतीवर(Farming) अवलंबून आहेत. शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या अवजारांची कमतरता भासते ज्यामुळे शेती करताना काही प्रमाणात अडचणी येतात. शेतीच्या कामात वापरण्यात येणारी यंत्रे व वाहने योग्य वेळेत उपलब्ध नसल्याने पेरणीपासून काढणीपर्यंतची(Harvesting) कामे शेतकऱ्यांना वेळेत पूर्ण करता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या याच समस्या लक्षात घेऊन शासनाकडून शेती यंत्रणांसाठी अनुदान(Subsidy) दिले जाते. यासाठी हरियाणा सरकारने पुढाकार घेतला आहे. हरियाणा सरकार कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत(Financial help) करत आहे. सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर(Tractor) खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देत आहे. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

3 लाख रुपयांची मिळेल आर्थिक मदत

हरियाणा सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना https://saralharyana.gov.in/ या वेबसाईटवर 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. या साईटवर जाऊन तुम्हाला साइन इन करून नोंदणी करावी लागणार आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सरल पोर्टलवर(Saral Portal) कौटुंबिक ओळखपत्र(Family identity card), बँकेचे तपशील(Bank Details), जात प्रमाणपत्र(Caste Certificate), शपथ पत्र, पॅन कार्ड(PAN Card),आधार कार्ड(Aadhaar Card) इत्यादी आवश्यक कागदपत्रे तेथे संलग्न करावी लागणार आहेत.

55 प्रकारच्या कृषी यंत्रांवर मिळेल अनुदान

हरियाणा सरकारकडून 55 प्रकारच्या कृषी यंत्रांवर सबसिडी देण्यात येत आहे. शेतकरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या https://saralharyana.gov.in/या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. आता खट्टर सरकार एसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना मदत करणार आहे. 89 योजनांतर्गत 35 एचपी क्षमतेच्या नवीन ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान(Subsidy) दिले जाणार आहे. यासाठी सरकारकडून काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. ज्याच्या आधारावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या ट्रॅक्टरचा वापर करून शेतकरी शेतीची कामे वेळेत पूर्ण करू शकणार आहेत. सरकारच्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे.