Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government subsidy scheme : 'या' सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतं 15 लाखांपर्यंत अनुदान

Government subsidy scheme

Government subsidy scheme : हार्वेस्टरची किंमत सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत आहे. सरकार त्यावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 40 टक्के, म्हणजे 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान देते.

Government subsidy scheme : भारत हा कृषीप्रधान देश आहे, 70 टक्के लोकं शेती हा व्यवसाय करतात. पण, शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला योग्य भाव नाही या सर्व समस्या शेतकऱ्यांच्या मागेच असतात. ही परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक प्रकारचे अनुदान देतात. शेतकऱ्यांच्या काही योजना 15 लाखांपर्यंत अनुदान देते, त्याबाबत जाणून घेऊया.

हार्वेस्टर अनुदान योजना 

शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर हे मुख्य यंत्र आहे. हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांकडे आढळून येते, कारण त्याची किंमत इतकी जास्त आहे की सर्वसाधारण शेतकरी ते खरेदी करू शकत नाहीत. हार्वेस्टरची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे. सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्यावर 40 टक्के म्हणजेच 15 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देते. देशातील अनेक शेतकरी दरवर्षी या योजनेचा मोठा लाभ घेतात. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

ट्रॅक्टर अनुदान योजना 

पूर्वीच्या काळी जे काम बैलजोडीने केले जात होते, ते आज ट्रॅक्टरने केले जाते. म्हणजेच शेत नांगरणीचे संपूर्ण काम आता ट्रॅक्टरद्वारेच केले जाते. वाढत्या महागाई बरोबरच ट्रॅक्टरसुद्धा खूप महाग झाले आहेत. पूर्ण पैसे देऊन खरेदी करणे कोणत्याही शेतकऱ्याला अवघड आहे. हे पाहता भारत सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर 40 टक्के अनुदान देते. म्हणजेच तुमच्या ट्रॅक्टरच्या 40 टक्के रक्कम सरकार देईल. उर्वरित रक्कम तुम्ही देऊन ट्रॅक्टर खरेदी करू शकता. 

शीतगृह योजना योजना 

भारत सरकार शेतकऱ्यांसाठी शीतगृह योजना राबवते. या योजनेंतर्गत, जर तुम्हाला तुमच्या परिसरात शीतगृह बांधायचे असेल, तर तुम्हाला सरकारकडून शीतगृह बांधण्यासाठी 50 टक्के किंवा त्याहून अधिक अनुदान दिले जाते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ग्रामीण शेतकरी असणे आवश्यक नाही, तुम्ही शहरात राहत असलो तरीही तुम्हाला या योजनेचे लाभ मिळू शकतात. अल्प प्रमाणात शीतगृह उघडण्यासाठी किमान 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे. मात्र यापैकी तुम्हाला सरकारकडून फक्त 5 लाख रुपये मिळतात, म्हणजेच कोल्ड स्टोरेज उघडण्यासाठी तुम्हाला फक्त 5 लाख रुपये खर्च करावे लागतात.

Source : www.abplive.com