Government Subsidy for Farmer: देशातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्यावतीने नेहमीच विविध योजना राबविण्यात येत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा, हा यामागील मुख्य हेतू असतो. अशीच एका योजनेविषयी आम्ही सांगणार आहोत, ज्याचे नाव ‘पीएम किसान ट्रॅक्टर योजना’ (PM Kisan Tractor Subsidy). या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
पीएम किसान ट्रॅक्टर योजना काय आहे (What is PM Kisan Tractor Scheme)
पीएम किसान ट्रॅक्टर योजना (PM Kisan Tractor Subsidy) ही 2022 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान मिळणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
पात्रता (Eligibility)
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकरी हा भारतीय असणे अनिवार्य आहे. त्यांचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असावे. तसेच शेतकऱ्याकडे शेतीसाठीची जमीन ही वादग्रस्त नसावी. सोबतच या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे भारतातील कोणत्याही बॅंकेत खाते असणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हे खाते त्याने आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.अर्जदार शेतकरी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखाच्या आत असावे. शेतकऱ्याने मागील सात वर्षात कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असावा.
आवश्यक कागदपत्रे (Necessary Documents)
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेच्या अनुदानसाठी शेतकऱ्याकडे आधारकार्ड, बॅंक अकाउंट पुस्तक, निवास प्रमाण पत्र, मोबाईल नंबर, मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म दाखला, बॅंक खाता विवरण, उत्पन्नाचा दाखला, शेतजमिनीसंबंधित कागदपत्रे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा (How to Apply)
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्याला जवळच्या लोकसेवा केंद्रात जाऊन अर्ज भरावा लागेल. किंवा जनसेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे शेतकरी ऑफलाइनदेखील अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे देशातील इतर राज्यांमध्ये या योजनेसाठी (प्रधानमंत्री शेतकरी ट्रॅक्टर सबसिडी योजना) ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.