Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Viral News: केंद्र सरकार खरंच सर्व मुलींना दरमहा 2100 रुपये देतंय का? खरं की खोटं?

Viral News

Viral News: केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत.

Viral News: केंद्र सरकार(Central Government) देशातील मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू मुलींना आर्थिक मदतीचा हात सरकारकडून दिला जातो. सध्या सोशल मीडियावर(Social Media) सरकारी योजनांच्या(Government Scheme) खोट्या बातम्या(Fake News) व्हायरल होत असलेल्या पाहायला मिळत आहेत.

योजना खरी की खोटी?

मुलीं संदर्भातील एका योजनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या योजनेमध्ये सर्व मुलींना सरकारकडून प्रति महिना  2,100 रुपये मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
एका युट्युब चॅनेलच्या माध्यमातू  ही फेक माहिती व्हायरल केली जात आहे. यासंदर्भात भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी(PIB) फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून(Twitter account) याबाबत लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 'सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवत जात नसल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.  हा मेसेज पूर्णपणे खोटा(Fake Message) आहे. मुलींना प्रति महिना 2,100 रुपये देण्याचा दावा खोटा असल्याचे पीआयबीने(PIB) स्पष्ट केले आहे.

खोट्या बातम्यांना बळी पडू नका

यासारख्याच अनेक वेगवेगळ्या योजनांच्या फेक न्यूज(Fake News) यापूर्वीही व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकजण सरकारच्या योजनांची चुकीची माहिती व्हायरल(Viral) करत असल्याचे पीआयबीचे(PIB) म्हणणे आहे. संबंधित चॅनेलने बनविलेला व्हिडीओमध्ये  खोटे दावे केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या दाव्यांना फसू नये व स्वतःची कोणतीही खाजगी माहिती(Don't share Personal Information) त्यांना देऊ नये असा संदेश देखील दिला आहे. 

देशातील मुलींसाठी सरकारने सुरु केलेल्या 'या' पाच योजना 

  1. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)
  2. बालिका समृद्धी योजना (Balika Samriddhi Yojana)
  3. सीबीएसई उडान योजना (CBSE Udaan Scheme)
  4. मुख्यमंत्री लाडली योजना (CM Ladali Scheme)
  5. माझी कन्या भाग्यश्री योजना (Mazi Kanya Bhagyashri Scheme) (या योजनसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 'Mahamoney' ला नक्की फॉलो करा.)