Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Exter: ह्युंदाईची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगची कार होणार एक्सटर? जाणून घ्या प्रकार अन् किंमत

Hyundai Exter: ह्युंदाईची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगची कार होणार एक्सटर? जाणून घ्या प्रकार अन् किंमत

Image Source : www.navbharattimes.indiatimes.com

Hyundai Exter: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई मोटर्सनं नवी कार एक्सटर लॉन्च केली आहे. एसयूव्ही प्रकारात पेट्रोल आणि सीएनजीच्या उपलब्धतेसह ती लॉन्च करण्यात आली. या कारमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊ कारचे विविध प्रकार आणि त्याच्या किंमती...

ह्युंदाई मोटर्सनं (Hyundai motors) आपली नवीन एसयूव्ही ह्युंदाई एक्सटर लान्च केली आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही (Sport utility vehicle) सेगमेंटमध्ये टाटा पंचला (Tata Punch) ही कार टक्कर देईल. टाटा पंच जी ग्लोबल-एनसीएपीची (NCAP) 5-स्टार रेटेड कार आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर ह्युंदाई एक्सटर ग्लोबल एनसीएपीची आणि आगामी भारत एनसीएपीची मानकांनुसार भारतातली सर्वात सुरक्षित कार म्हणून उदयास येईल, असा कंपनीला विश्वास आहे.

स्टार्टिंग रेंज 5.99 लाख रुपये

ह्युंदाई एक्सटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप वेरिएंटसाठी 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही कंपनीची ही छोटी एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर व्हेरिएंटनुसार त्याची किंमत जाणून घ्या. याचा सविस्तर आढावा टाइम्सबुलनं घेतला आहे.

ह्युंदाई एक्सटरची व्हेरिएंटनुसार किंमत :

  1. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter EX एक्स-शोरूम किंमत 5,99,900 रुपये
  2. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – EX (O) एक्स-शोरूम किंमत 6,24,990 रुपये
  3. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – S एक्स-शोरूम किंमत 7,26,990 रुपये
  4. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – S (O) एक्स-शोरूम किंमत 7,41,990 रुपये
  5. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT Exter – S एक्स-शोरूम किंमत रु. 7,96,980
  6. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – SX एक्स-शोरूम किंमत 7,99,990 रुपये
  7. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – SX ड्युअल टोन एक्स-शोरूम किंमत 8,22,990 रुपये
  8. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – SX (O) एक्स-शोरूम किंमत 8,63,990 रुपये
  9. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT Exter – SX एक्स-शोरूम किंमत रु 8,67,990
  10. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT Exter – SX ड्युअल टोन एक्स शोरूम किंमत 8,90,990 रुपये
  11. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – SX (O) Connect एक्स-शोरूम किंमत 9,31,990 रुपये
  12. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT Exter – SX (O) एक्स-शोरूम किंमत रु. 9,31,990
  13. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल Exter – SX (O) कनेक्ट ड्युअल टोन एक्स-शोरूम किंमत 9,41,990 रुपये
  14. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT Exter – SX (O) Connect एक्स-शोरूम किंमत रु. 9,99,990
  15. Hyundai Exter 1.2 l Kappa पेट्रोल स्मार्ट ऑटो AMT Exter – SX (O) कनेक्ट ड्युअल टोन एक्स-शोरूम किंमत रु. 10,09,990
  16. Hyundai Exter 1.2 l Kappa Bi-Fuel CNG 5-स्पीड मॅन्युअल Exter – S CNG एक्स-शोरूम किंमत 8,23,990 रुपये
  17. Hyundai Exter 1.2 l Kappa Bi-Fuel CNG 5-स्पीड मॅन्युअल Exter – SX CNG एक्स-शोरूम किंमत 8,96,990 रुपये