Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How To Save Tax: तुमचे आई-वडील तुमचा टॅक्स वाचवायला मदत करतील, कसा जाणून घ्या

How To Save Tax

How To Save Tax: सरकारने दिलेल्या कर सवलतीचा फायदा तुम्हीही घेऊ शकता. तुम्हीही तुमचा कर आई- वडिलांच्या मदतीने वाचवू शकता, तो कसा हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

How To Save Tax: नोकरदार व्यक्ती सरकारला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कर देत असतो. पण हाच कर वाचविण्यासाठी अनेकजण आयकर(Income Tax) कलम 80 सी चा अधिक वापर करतात. त्याअंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीला करामध्ये सूट देण्यात येते. विमा पॉलिसी (Insurance Policy), पीपीएफ (PPF) आणि फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करून लोक सहसा 80C च्या करामध्ये सूट मिळवतात. या व्यतिरिक्त, अशी अनेक साधने आहेत ज्याच्या माध्यमातून आपण आयकरातून बचत करू शकतो. विशेष म्हणजे तुमचे आईवडील कर वाचवण्यासाठी मदत करू शकतात. तुम्ही म्हणाल ते कसं? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

आई- वडिलांची विमा पॉलिसी काढा

तुमच्या आई - वडिलांचा आरोग्य विमा (Health insurance) काढा व त्याचा हप्ता तुम्ही भरत असल्यास करात सूट मिळवू शकते. जर तुमच्या आई -वडिलांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आरोग्य विमा घेत असाल तर त्याचा हप्त्यांवर करातून तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत सहज सूट मिळते. आई- वडिलांचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर ही रक्कम 25,000 पर्यंत मर्यादित असते.

tax-saving.jpg

पालकांना भाडे देऊन HRA साठी दावा करा

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि आई- वडिलांच्या घरात राहत असाल तर कंपनीला घराचे भाडे(HRA) दाखवून त्यावर दावा करू शकता. आई-वडील कराच्या स्लॅबमध्ये येत असतील तर हे फायद्याचे ठरू शकते. तुमचे घर भाडे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड(Pan Card) आणि इतर डिटेल्सही द्यावे लागतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घर तुमच्या आई - वडिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे.  घर भाडे हे पालकांच्या उत्पन्नात जोडले जाईल आणि त्यावर त्यांना कर द्यावा लागेल.

आई - वडिलांच्या नावाने गुंतवणूक सुरु करा

कर वाचण्यासाठी तुम्ही आई-वडिलांच्या नावावर एफडी(FD) करू शकतात जेणेकरून तुम्हाला करामध्ये सूट मिळवता येते. ज्येष्ठ नागरीक बचत योजना, पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Saving Scheme), किंवा एफडी करुन गुंतवणूक करून तुम्ही कर बचतीचा लाभ घेऊ शकता. 
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात  केलेल्या एफडी, बचत योजनेमधून  कमावण्यात आलेल्या व्याजावर 50,000 रुपयांची सूट मिळते.  कलम 80 टीटीबीच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरीक एका आर्थिक वर्षाच्या दरम्यान अनेक फिक्स डिपॉझिटमधून 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजमुळे कर मुक्त होतात. तर 60 वर्ष अधिक वय असलेली व्यक्ती  ज्येष्ठ नागरिक प्रवर्गामध्ये येते. यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना फक्त 10,000 रुपयांची सूट मिळते. जर व्याज सूट मर्यादेपेक्षा कमी असेल तरी कराची दायित्व कमी होत असते.