Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Exam Fees : दहावी (SSC), बारावीचं (HSC) परीक्षा शुल्क वाढणार

Exam Fees

Image Source : www.educart.co

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचं शुल्क वाढणार आहे. शिक्षण मंडळाने 30% शुल्क वाढीचा प्रस्ताव राज्यसरकारकडे ठेवला आहे.

दहावी (SSC) तसंच बारावीच्या (HSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षीपासून परिक्षेचा अर्ज भरताना आधीच्या तुलनेत जास्त शुल्क भरावं लागणार आहे . मागच्या अनेक वर्षांमध्ये परीक्षा शुल्कात वाढच न झाल्यामुळे अखेर माध्यमिक व उच्च-माध्यमिक शिक्षण मंडळाने (Secondary & Higher Secondary Education Board) यंदा राज्यसरकारकडे (State Government) थेट 30% शुल्क वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.   

राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Shard Gosavi) यांनीच ही माहिती मीडियाला दिली आहे. राज्य शिक्षण मंडळ ही राज्यसरकारच्या अखत्यारीत येणारी पण, स्वायत्त संस्था आहे. दरवर्षी साधारण 30 लाख मुलांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा धेण्याचं काम मंडळ करत असतं. या परिक्षेचे अर्ज भरताना मिळणारं परीक्षा शुल्क आणि उत्तर पत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी आकारलं जाणारं शुल्क यातून या मंडळाला उत्पन्न मिळतं.     

सध्या बारावीचं परीक्षा शुल्क 415 रुपये तर दहावीचं परीक्षा शुल्क 375 रुपये इतकं आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नामधून मंडळ परीक्षा आयोजित करण्याचं काम पार पाडते. पण, 2017पासून परीक्षा शुल्कात वाढच झालेली नाही. पण, परिक्षेचा दरडोई खर्च मात्र वाढला आहे.     

त्यामुळे अखेर राज्य शैक्षणिक मंडळाने यंदा परीक्षा शुल्कात 30% वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन यांचीही सोय होत नसल्यांचं मंडळाचं म्हणणं आहे. दरवर्षी साधारण 40 ते 50 कोटींचा तोटा शिक्षण मंडळाला सहन करावा लागत असल्याचं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटलं आहे.     

‘राज्यसरकारकडे आम्ही परीक्षा शुल्कात 30% वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी परीक्षा शुल्क जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे हे बदल यंदाच्या वर्षी नाही करता येणार. पण, पुढच्या वर्षीपासून शुल्क वाढ करण्याची परवानगी मिळावी, अशी आमची सरकारकडे विनंती आहे,’ असं गोसावी मीडियाशी बोलताना म्हणाले.