Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV charging station आता IOCL च्या पेट्रोल पंपावरही मिळणार

EV charging station

वेगवेगळ्या कंपन्या आणि स्टार्ट अप इलेक्ट्रिक वाहनांच्या इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहेत. यात आता पेट्रोल-डीझेलची विक्री करणारे पेट्रोल पंप सुद्धा सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरही आता लवकर चार्जिंग स्टेशन बघायला मिळू शकतील.

वेगवेगळ्या कंपन्या आणि स्टार्ट अप इलेक्ट्रिक वाहनांच्या इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहेत. यात आता पेट्रोल-डीझेलची विक्री करणारे पेट्रोल पंप सुद्धा सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरही आता लवकर चार्जिंग स्टेशन बघायला मिळू शकतील. 

18 प्राइम लोकेशन वर EV charging station 

Statiq ने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे टेंडर जिंकले आहे.  यामध्ये IOCL स्टेटिकच्या सहाय्याने देशभरातील 18 प्राइम लोकेशनवर चार्जिंग लावणार आहे. Statiq charging infrastructure वर वेगाने काम करत आहे. IOCL कडून 2046 पर्यंत झीरो एमीशनचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. यासाठी कंपनीने 2 ट्रिलियन रुपयाचे बजेट तयार केले आहे. IOCL बायोफ्यूल, ग्रीन हायड्रोजन, रिन्यूएल एनर्जी यासारख्या काही एमीशन मिटीगेशन चॅनलवर काम करत आहे. IOCL चा हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर इलेक्ट्रिक वाहन धारकांना याचा फायदा होईल. यामुळे चारजिंगचे टेंशन न घेता प्रवास करता येईल.   

IOCL कडून याविषयी काय सांगण्यात आले?

Statiq च्या कॉर्पोरेट अफेअर्स आणि गव्हरमेन्ट रिलेशनचे प्रमुख अमन रहमान यांचे म्हटले आहे की, IOCL केवळ इंधन बाजारातील सगळ्यात मोठी कंपनी आहे असे नव्हे तर कार्बन एमीशन कमी करण्याचा विषय येतो तेव्हाही कंपनी सगळ्यात पुढे असते. IOCL चे मॅनेजिंग डायरेकटर आणि चेअरमन श्रीकांत माधव वैद्य यांनी सांगितले आहे की, IOCL मध्ये आम्ही कार्बन न्यूट्रालिटीला योग्य पद्धतीने सुरू केले आहे. आमचे नियोजन होते की आम्हाला सक्षम इलेक्ट्रिक मोबिलिटी पार्टनर मिळावा. आणि statiq ने हे टेंडर जिंकल्याने आमचा शोध संपला. Statiq आम्हाला गुणवत्तापूर्ण मेड इन इंडिया इवी चार्जर देईल ज्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वच्छ ऊर्जा पोचवू शकू.