By Ankush Bobade24 Feb, 2023 17:204 mins read 47 views
Electric Vs Non-Electric Vehicles: इलेक्ट्रिक कार ही नॉन-इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत अधिक महाग आहे. पण इंधनाचा तितकासा खर्च नाही आणि मेन्टेनन्सचाही खूप खर्च नाही. यामुळे पैशांची बचत होते. तसेच इलेक्ट्रिक कार घेतल्यास तुमच्या व्याजदरावरही फरक पडतो. कसा ते चला पाहुया.
Electric Vs Non-Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांचा मेन्टेनन्स आणि इंधनाची कार्यक्षमता यामुळे या प्रकारातील गाड्या सध्या लोकप्रिय आहेत. पण या गाड्या टिकाऊ आहेत की नाही, याबाबत संभ्रम आहे. कारण अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या दुर्घटना घडत आहेत. कालांतराने त्या कमी होतील. पण तुम्हाला जर कार घ्यायची असेल तर तुम्ही कोणती कार घ्याल. याबाबत आपण दोन्ही कार्सची माहिती घेऊ. त्यातील फरक समजून घेऊ. मग तुम्ही तुमच्या पसंतीची कार नक्कीच घेऊ शकता.
गाडी इलेक्ट्रिक असो किंवा नॉन-इलेक्ट्रिक (Non-Electric Car) ती घेण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. कार घेणे ही गरज आहे का? की तो आपल्या राहणीमानाचा किंवा स्टेट्सचा विषय आहे आणि त्यासाठी तुम्ही बजेट किती निश्चित केले आहे. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही कर्ज काढून गाडी घेण्याचा विचार करत असाल तर, गाड्यांसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक (Electric Car) आणि नॉन-इलेक्ट्रिक कार्ससाठी वेगवेगळे व्याजदर आकारतात. त्यामुळे सर्वप्रथम वरील प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा आणि पुढीलप्रमाणे गोष्टी तपासून त्याचा निर्णय घ्या.
इलेक्ट्रिक गाड्यांवरील कर्जाचे व्याजदर हे नॉन-इलेक्ट्रिक गाड्यांपेक्षा कमी असू शकतात. कारण सरकार स्वत:हून इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमोट करत आहे. या गाड्यांमुळे इंधनाची मागणी कमी होऊ शकते. तसेच प्रदूषण आटोक्या येण्यासाठी याची मदत होऊ शकते. त्यामुळे सरकारसह बॅंकाही इलेक्ट्रिक कार्ससाठी कमी व्याजदर आकारू शकतात. पण तरीही कर्ज काढून गाडी खरेदी करताना वेगवेगळ्या बॅंकांचे व्याजदर लक्षात घेऊन त्यांची तुलना करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही विकत घेतलेल्या गाडीवर तुम्हाला किती कर सवलत मिळू शकते किंवा तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही, हे ठरते. कारण गाड्यांवरील टॅक्स आकारणी हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. त्यामुळे काही राज्यांनी लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत. यासाठी त्यावरील टॅक्समध्ये बेनिफिट्स दिले जात आहेत.
गाडीचा इन्शुरन्स ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे; मग ती गाडी इलेक्ट्रिक असो किंवा नॉन-इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती पाहता नॉन-इलेक्ट्रिक गाड्यांचा इन्शुरन्स हा तुलनेने कमी असू शकतो. त्यामुळे गाडी खरेदी करण्यापूर्वी किंवा गाडीची निवड करण्यापूर्वी इन्शुरन्सचे रेट्स सुद्धा तपासून घ्यावेत.
Hero Moto Price Rise: वाढत्या महागाईने वाहन उत्पादकांना दरवाढ करावी लागली आहे. दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 एप्रिल 2023 पासून वाहनांच्या किमतीत 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकीने पहिल्यांदाच ब्रेझा गाडीचे सीएनजी व्हेरियंट (Brezza CNG) बाजारात आणले आहे. मागील अनेक दिवासांपासून या गाडीची चर्चा सुरू होती. ही गाडी चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून बुकिंगही सुरू झाले आहे. 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये ब्रेझा CNG गाडी ग्राहकांना चांगला पर्याय आहे. अॅव्हरेज आणि किंमतही परवडणारी आहे.
BS6-II: प्रदूषण नियंत्रणासाठी एप्रिलपासून BS6-II नियमावली लागू होणार आहे. या नियमांमुळे वाहनांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. रिअल टाइम प्रदूषण मोजण्यासाठी नवीन डिव्हाइसेस गाड्यांमध्ये बसवण्यात येतील. त्यामुळे वाहन निर्मिती खर्चातही वाढ होईल. प्रवासी वाहने, दुचाकी आणि कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढू शकतात.