Top 5 Electric Cars: भारतातील इलेक्ट्रिक कार मार्केट मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. सरकारसुद्धा इलेक्ट्रिक कार घेण्यासाठी सवलत देत आहे. तुलनेने त्याची किंमत कमी आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी स्टेशन्स सुद्धी उभारली जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढू लागली आहे.
2023 च्या आर्थिक पाहणी अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, 2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक गाड्यांची संख्या 1 कोटीपर्यंत वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सध्या इलेक्ट्रिक कारचे मार्केट बऱ्यापैकी टाटा मोटर्सने काबीज केले आहे. त्यानंतर इतर कंपन्यांमध्ये बीवायडी, महिंन्द्रा ॲण्ड महिंन्द्रा, एमजी मोटर्स आणि ह्युंदायी या कंपन्या आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बेस्ट इलेक्ट्रिक कार्स घेऊन आलो आहोत.
Table of contents [Show]
टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV)
टाटा कंपनीची टियागो ईव्ही ही कार सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च झाली आहे. या कारची किंमत 8.49-11.79 लाख या दरम्यान आहे.
सिटरॉन ईसी3 (Citroen eC3)
सिट्रॉन कंपनीची ईसी3 ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च झाली आहे. त्याची अंदाजित किंमत 8.99 लाख रुपये आहे.
टाटा नेक्सॉन ईव्ही प्राईम/मॅक्स (TATA Nexon EV Prime/Max)
टाटा कंपनीचे नेक्सॉन ईव्ही प्राईम /मॅक्स हे मॉडेल जानेवारी 2020 मध्ये लॉन्च झाले आहे. यापैकी नेक्सॉन प्राईमची किंमत 14.49-16.99 लाख आहे. तर मॅक्स मॉडेलची किंमत 16.49-18.99 लाख आहे.
बीवायडी ॲटो 3 (BYD Atto 3)
बीवायडी कंपनीची बीवायडी अॅट्टो 3 हे मॉडेल नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च झाले आहे. याची किंमत 33.99-34.49 लाख इतकी आहे.
मर्सिडिझ बेंझ ईक्यूएस (Mercedes Benz EQS)
मर्सिडिज बेन्ज कंपनीने ईक्यूएसचे दोन इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च केले आहेत. त्यातील ईक्यूएस 53 हे मॉडेल ऑगस्ट 2022 मध्ये लॉन्च केले होते. तर दुसरे मॉडेल ईक्यूएस 580 हे सप्टेंबर, 2022 मध्ये लॉन्च केले.