एका वर्षाच्या आत भारतात इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल गाड्यांच्या किमतीत मिळतील. यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर होणारा परकीय चलनातील खर्च वाचवण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती आटोक्यात आल्या की, आपोआप पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी होईल. त्यामुळे सरकारला पेट्रोल आणि डिझेलऐवजी पिकांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रोत्साहन देता येईल. सध्या नॉर्मल श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या दुप्पट आहे. सध्या, बॅटरीच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनं EV महाग आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीपैकी बॅटरीचीच किमत एकूण किमतीच्या 35 ते 40 टक्के असते.
सध्या, नियमित प्रवासी वाहनांच्या प्रकारात, सामान्य श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत ही पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या किमतीच्या दुप्पट आहेत. दोन चाकी प्रकारातही इलेक्ट्रिक दुचाकींची किंमत नियमित दुचाकींच्या किमतीपेक्षा दीडपट अधिक आहेत.
भारतातील टॉप 14 इलेक्ट्रिक कार्स आणि त्याच्या किमती
टॉप 9 इलेक्ट्रिक टुव्हिलर्स आणि त्याच्या किमती
image source - https://bit.ly/3OngbUB