Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Management Tips: पैसे भरपूर कमावतो, पण बचतच होत नाही?जाणून घ्या 50-30-20 फॉर्म्युला!

Money Management Tips

Personal Finance Tips: महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन होण्यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.

Personal Saving Tips: नोकरी किंवा बिझनेसमधून कमावलेले पैसे अनेकदा शिल्लक राहत नाहीत. बऱ्याच जणांना पगार होतो कधी आणि संपतो कधी, हेच कळत नाही. महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन केले तर, काही पैसे शिल्लक राहू शकतात. या उरलेल्या रक्कमेची बचत / गुंतवणूक केली तर, पुढे भविष्यात ही रक्कम गरजेला उपयोगी येऊ शकते. यासाठी पैशांच्या नियोजनातील 50-30-20 फॉर्म्युला वापरला तर तुमचा नक्कीच फायदा होईल. चला तर 50-30-20 फॉर्म्युला (Personal Finance) म्हणजे नेमके काय? याची माहिती घेऊ.

50-30-20 नुसार फायनान्स प्लॅनिंग म्हणजे काय? What is 50-30-20 Formula?

50-30-20 हा फॉर्म्युला म्हणजे हाती आलेल्या रकमेतून 50% रक्कम महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करून, 30% रक्कम स्वतःच्या सुख-सोयींसाठी वापरून, 20% रकमेची बचत आणि गुंतवणूक करणे, याला 50-30-20 फायनान्स सेव्हिंग फॉर्म्युला म्हणतात.

50-30-20 हा फॉर्म्युला आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार 20 हजार रुपये इतका असेल तर त्या व्यक्तीने पगारातील 50% रक्कम म्हणजेच 10 हजार रुपये घराचे भाडे, लाईट बील, पाणी, इंटरनेट बिल, कर्जाचा ईएमआय, प्रवास यावर खर्च केले पाहिजेत. उरलेली 30% रक्कम म्हणजे 6 हजार रुपये ब्रँडेड कपडे, अॅक्सेसरीज, ज्वेलरी यांसारख्या अनेक गोष्टींवर खर्च होऊ शकतात. यात अनावश्यक वस्तूंवर खर्च न करता विचारपूर्वक खर्च केला तर, बऱ्यापैकी पैशांची बचत होऊ शकते. तसेच, उरलेली 20% रक्कम अर्थात 4 हजार रुपये बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे.


50-30-20 नियोजनाचा फायदा काय? Benefits of 50-30-20 Formula?

हाती आलेल्या रकमेनुसार महत्त्वाच्या गरजा लक्षात घेऊन 50-30-20 च्या पद्धतीचे अवलंबन केले पाहिजे. 50% रक्कम घराचा संपूर्ण खर्च, 30% रक्कम स्व: खर्च आणि 20% रकमेची बचत केली पाहिजे. असे केल्याने बऱ्याच गरजा आटोक्यात राहून गुंतवणूक करण्यासाठी पैसे शिल्लक राहतील. पैसे वापरण्याची तसेच खर्च करण्याची कला 50-30-20 च्या नियमामुळे कळू शकेल. यातून पैसे बचत करण्याच्या सवयीमुळे विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण राहू शकेल. 50-30-20 च्या आर्थिक नियोजनामुळे पैसे वाचवण्याची शिस्त लागून खर्च आटोक्यात राहण्यास मदत होईल.