Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Impact Awards: डिजिटल इम्पॅक्ट पुरस्काराची घोषणा, शासनाच्या कोव्हिन, डिजि लॉकर अॅपना पुरस्कार!

Digital Impact Awards

Image Source : www.pandemictechnews.com

e4m-DNPA Digital Impact Awards: डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने, डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स जाहीर केले आहेत. यात वर्षभरात सर्वाधिक वापरलेले गेलेले भारतीय सरकारच्या कोविन अॅपला पुरस्कार जाहिर झाला आहे. यासह इतर कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मना पुरस्कार मिळणार आहेत, हे या बातमीतून जाणून घ्या.

CoWin, Himmat App among winners at Digital Impact awards: डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने ई फोर एम - डिएनपीए (e4m-DNPA) डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स (Digital Impact Awards) जाहीर केले आहेत. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे कोविन अॅप आणि दिल्ली पोलिसांच्या हिम्मत प्लस अॅपला डिजिटल इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ई फोर एम - डिएनपीए (e4m-DNPA) डिजिटल कॉन्क्लेव्ह आणि डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स 20 जानेवारी रोजी दिल्लीत दिले जातील.

पुरस्कार विजेत्यांमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC: One Nation One Ration Card), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे कोविन (CoWIN) अॅप, वित्तीय सेवा विभागाची प्रधानमंत्री जन धन योजना, महसूल विभाग - वित्त मंत्रालयाचा जीएसटी, दिल्ली पोलिसांचे 'हिम्मत' अॅप यासह पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे कॅम्पा (CAMPA) अॅप, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (MEITY) मंत्रालयाचे ई सरकार (E Gov) पोर्टल आणि डिजी लॉकर (Digi Locker), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदचे (NCERT: National Council of Educational Research and Training) दिक्षा (DIKSHA) प्लॅटफॉर्म, शिक्षण मंत्रालय आणि महिला विकास मंत्रालयाचे विभाग आणि पोशन (POSHAN) ट्रॅकर अॅप. भारतातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या 17 शीर्ष प्रकाशकांच्या डिजिटल आर्म्सची सर्वोच्च संस्था, डिएनपीएकडून त्यांनी प्रतिष्ठित डिजिटल प्रभाव पुरस्कार जिंकला आहे. ई फोर एम - डिएनपीए (e4m-DNPA) डिजिटल इम्पॅक्ट अवॉर्ड्स आज जाहीर करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन आणि राष्ट्र उभारणीत बदल घडवून आणणाऱ्या डिजिटल इनोव्हेशन्सना पुरस्कार देण्यात आले आहेत.

डिएनपीए काय आहे? (What is DNPA?)

डिएनपीए (DNPA: Digital News Publishers Association) ही भारतातील मीडिया व्यवसायाच्या डिजिटल विंगची एक छत्री संस्था आहे. यामध्ये दैनिक जागरण, दैनिक भास्कर, इंडियन एक्स्प्रेस, मल्याळम मनोरमा, ईटीव्ही, इंडिया टुडे ग्रुप, टाइम्स ग्रुप, अमर उजाला, हिंदुस्तान टाइम्स, झी न्यूज, एबीपी नेटवर्क, लोकमत, एनडीटीव्ही, न्यू इंडियन एक्सप्रेस, मातृभूमी, हिंदू आणि नेटवर्क 18 यांचा समावेश आहे. 17 माध्यम प्रकाशकांचा समावेश आहे.

या पुरस्कारांचे ज्युरी कोण होते? (Who was the jury?)

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील प्रख्यात ज्युरीद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. ज्युरी सदस्यांमध्ये माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय भागीदार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE: Bombay Stock Exchange), रवी राजन आणि कंपनी (Ravi Rajan & Company) आणि भारतीय पर्यटन वित्त निगम (TFCI: Tourism Finance Corporation Of India) अध्यक्ष एस रवी, माजी सचिव, माहिती - तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांचे अरुणा शर्मा यांचा समावेश आहे.

पुरस्काराची रक्कम किती असणार? (What'll be the award amount?)

डिजिटल इम्पॅक्ट पुरस्कार प्रत्येक 8 श्रेणीतील विजेत्या प्लॅटफॉर्मला 50 हजारची रक्कम देण्यात येणार आहे. तर विशेष पुरस्कारा अंतर्गत डिजिटल चॅम्पियनमध्ये गोल्डन विंग्ज विजेत्या प्लॅटफॉर्मला 1 लाखांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. सिल्व्हर विंग्स विजेत्या प्लॅटफॉर्मला 50 हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.