Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E Registration For Construction Companies: आता घरबसल्या करता येणार बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी

E Registration For Construction Companies

E Registration For Construction Companies: स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीची दस्त नोंदणी या प्रणाली मार्फत केली जाऊ शकते.

E Registration For Construction Companies: बांधकाम व्यावसायिकांना घरबसल्या दस्त नोंदणीची कार्यवाही करण्यासाठी विकसित केलेली ई-रजिस्ट्रेशन(E Registration For Construction Companies)  प्रणाली विभागासाठी मैलाचा दगड ठरत आहे. स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी(Online E Registration) या प्रणाली मार्फत केली जाऊ शकते. (Builders Workshop) त्यासाठी यापुढे व्यावसायिकाला नोंदणी कार्यालयात जाण्याची कुठलीही आवश्यकता भासणार नाही, असे हर्डीकर यांनी सांगितले आहे.

कोणत्याही वेळी करता येईल नोंदणी

याकरिता बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम प्रकल्पाची सर्व माहिती या प्रणालीवर नोंदविणे गरजेचे आहे. ही प्रणाली 24x7 कार्यान्वित राहणार असून सुटीच्या दिवशीही बांधकाम व्यावसायिक दस्तऐवज नोंदवू शकणार आहेत. विशेष म्हणजे या प्रणालीचा वापर केवळ कामकाजाच्या वेळेतच करावा असे कुठलेही बंधन घालण्यात आलेले नाही. व्यावसायिक हे त्यांच्या व पक्षकारांच्या सवडीनुसार रात्री उशिरासुध्दा या प्रणालीअंतर्गत दस्त नोंदणी करु शकतात. ही प्रणाली बिल्डर(Builder) व पक्षकार यांना नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी लागणारा विलंब व दगदग कमी करण्यासाठी आणली आहे.

बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांसाठी आवाहन

ई-रजिस्ट्रेशन(E registration) हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ई-गव्हर्नन्स(E- Governors) अंतर्गत केंद्र शासनाचा(Central Government) प्रथम पुरस्कार नोंदणी व मुद्रांक विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करण्यासाठी बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हर्डीकर यांनी केले. प्रणालीचा वापर करताना अडचण आल्यास नोंदणी विभागाने हेल्पलाईनही तयार केली आहे.