सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधेसोबतच सरकार आर्थिक मदतही करते. अनुसूचित जाति, नव बौद्ध समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यातून भविष्याला आकार देण्याच्या हेतूने राज्य सरकारने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana) अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत लाभ कसा मिळवावा ते पाहूया.
Table of contents [Show]
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? (Who can avail this scheme?)
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील ज्यांनी किमान इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे, अशा विद्यार्थ्यांना मदत दिली जाते.
तरच मिळणार योजनेचा लाभ (Benefits of Scheme)
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
- विद्यार्थ्याला प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के आहे.
- विद्यार्थ्याचे ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे ते महाविद्यालय महानगरपालिका हद्दीपासून 05 कि.मी. च्या आत असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करू शकतात.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
योजनेच्या लाभाचे स्वरूप (Nature of Benefits of the scheme)
- या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील लाभ मिळणार आहेत.
- भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता देण्यात येतो.
- या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येते.
- या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना बोर्डिंग सुविधेसाठी 28,000 रुपये, लॉंजिंग सुविधेसाठी 15,000 रुपये, विविध व्यय (खर्च) म्हणून 8,000 रुपये, मेडिकल आणि इंजिनिअरिंग पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी 5000 रुपये (अतिरिक्त) , अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी 2,000 रुपये असे एकूण 51,000 रुपयांची मदत विद्यार्थ्यांना केली जाते.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करावा? (How to apply for the scheme?)
अर्जदाराने प्रथम महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर अर्जदारा होम पेजवर जाऊन स्वाधार योजना फॉर्म डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर फॉर्म पूर्णपणे भरावा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून संबंधित समाजकल्याण कार्यालयात जमा करावा. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.