Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Insurance: विमा घ्यायचाय! पण तुमची डॉक्युमेंट्स परिपूर्ण आहेत काय?

Documents for Term Insurance Plan

Term Insurance: टर्म इन्शुरन्स प्लॅन हा कायदेशीर करार आणि भविष्यात आकार घेऊ शकणारा आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ओळख प्रस्थापित करण्यासोबतच तुमच्याबद्दलची इतर माहिती इन्शुरन्स कंपनीसमोर उघड करावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे देणे अत्यावश्यक आहे; मग पॉलिसी तुम्ही ऑनलाईन खरेदी करा किंवा ऑफलाईन.

मुदत विमा अर्थात टर्म इन्शुरन्स प्लॅन हा जीवन विम्याचा (Life Insurance) सर्वात शुद्ध असा प्रकार आहेत. टर्म प्लॅन पॉलिसीधारकाला आणि त्याच्या कुटुंबाला जीवनातील अनिश्चिततेपासून दीर्घकालीन आर्थिक संरक्षण देतो. मात्र टर्म इन्शुरन्स प्लॅन (Term Insurance) देण्यापूर्वी इन्शुरन्स कंपनी पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे/डॉक्युमेंट्स जमा केले गेले असल्याची  खात्री करून, मगच पॉलिसीसाठीचा प्रस्ताव स्वीकारते. जर तुम्ही सुद्धा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्व-माहिती असेल, तर तुमचे इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याचे कर्तव्य नियोजित वेळेत पूर्ण करू शकाल.

टर्म इन्शुरन्स प्लॅनसाठी कागदपत्रे का आवश्यक आहेत?

टर्म इन्शुरन्स प्लॅन हा कायदेशीर करार आणि भविष्यात आकार घेऊ शकणारा आर्थिक व्यवहार आहे. Uberrima fides म्हणजे utmost good faith (सर्वोच्च विश्वासाचे तत्व) इन्शुरन्सचे  मूलभूत तत्व आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ओळख प्रस्थापित करण्यासोबतच तुमच्याबद्दलची इतर माहिती इन्शुरन्स कंपनीसमोर उघड करावी लागते. तुमची डॉक्युमेंट्स क्लिअर आणि पूर्णपणे उपलब्ध असल्यास  आत्यंतिक  गरजेच्या वेळी, तुमच्‍या कुटुंबातील सदस्‍य इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम दाखल करतील, तेव्हा त्‍याला किंवा तिला “क्लेम सेटलमेंट प्रोसेस”मध्ये विलंब होणार नाही आणि इतर कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.  तेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स प्लॅनसाठी आवश्यक कागदपत्रे देणे अत्यावश्यक आहे, मग पॉलिसी तुम्ही ऑनलाईन खरेदी करा किंवा ऑफलाईन.

टर्म इन्शुरन्ससाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

1. अधिकृतपणे वैध दस्तऐवज म्हणून खालील पैकी कोणतेही डॉक्युमेंट पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकतात,

  • पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र (Voter’s Card)
  • आधार कार्ड
  • NREGA द्वारे जारी केलेले आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍याने स्वाक्षरी केलेले जॉब कार्ड


2. वरील कागदपत्रांव्यतिरिक्त पॅन कार्ड (PAN Card) सादर करणे आवश्यक आहे. PAN Card नसल्यास फॉर्म 60 भरून देणे बंधनकारक आहे.

3. PMLA Rules, 2019 अर्थात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टनुसार, खालीलपैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागतो,

  • दोन महिन्यांपेक्षा जुने नसलेले युटिलिटी बिल (वीज, टेलिफोन, पोस्ट-पेड मोबाईल फोन, पाईप गॅस आणि पाण्याचे बिल)
  • मालमत्ता किंवा महापालिका कर पावती
  • निवृत्त व्यक्तींना पेन्शन किंवा फॅमिली पेन्शनच्या पेमेंट ऑर्डर (Pension Payment Order)


4. उत्पन्नाचा पुरावा (Income Proof) म्हणून खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देणे आवश्यक आहे,


5. तुम्ही स्वयंरोजगार / स्वयं-उद्योजक असाल तर खालीलपैकी एक डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे,

  • इन्कम कॅल्क्युलेशन सहित 2 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचा पुरावा
  • उत्पन्नाची गणना उपलब्ध नसल्यास,  मागील  3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचा पुरावा
  • तुमच्या CA नी  प्रमाणित ऑडिट केलेली बॅलन्स-शीट आणि प्रॉफिट-लॉस अकाउंट (मागील 2 वर्षांचे)
  • टॅक्स क्रेडिटचा फॉर्म 26 AS
  • शेतीपासून उत्पन्न असल्यास कृषी उत्पन्न प्रमाणपत्र (1 वर्षापेक्षा जुने नाही)
  • बाजार खरेदी-विक्रीच्या पावत्या (नजीकच्या 2 महिन्यातील)


टर्म इन्शुरन्ससाठी आवश्‍यक असलेली ही कागदपत्रे एजंटकडे देत असताना किंवा ऑनलाईन अपलोड करीत असताना, कागदपत्रांच्या पुढील आणि मागच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे स्कॅन केली, ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सोबत पासपोर्ट आकाराचा फोटो सबमिट करणे आवश्यक आहे. शिवाय, टर्म इन्शुरन्स प्लॅनच्या खरेदीसाठी आवश्यक असलेल्या या कागदपत्रांव्यतिरिक्त, तुम्हाला तुम्ही यापूर्वी घेतलेल्या इतर लाईफ इन्शुरन्स पॉलिसींचे तपशील देखील स्पष्ट करावे लागतात. 

याखेरीज प्रपोजल फॉर्म भरत असताना, तुम्हाला तुमच्या आरोग्याची स्थिती आणि आधीच अस्तित्वात असलेले रोग (जर काही असतील), तर त्याबद्दल तपशील द्यावा लागेल. तुमच्या प्रतिसादांच्या आधारे, इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तुमच्या सध्याच्या मेडिकल स्थितीची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणी (Medical Checkup) करण्यास सांगू शकते. तुमच्या पॉलिसीची मान्यता आणि तुमची प्रीमियम रक्कम अशा पॅरामीटर्सवर अवलंबून असते. आणि हो सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या सर्व डॉक्युमेंट्स सोबत “प्रीमियमची रक्कम अदा करीत असल्याचा चेक” जोडायला मात्र विसरू नका!