“आगाह अपनी मौत से कोई बसर नहीं..... सामान सौ बरस का और पल की खबर नहीं…..” अर्थात माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर असतं. कित्येक वर्षांच्या, दशकांच्या योजना आपण आखत असतो. मात्र पुढच्या क्षणी काय होईल, याची थांगपत्ता देखील आपल्यापैकी कुणालाच नसतो. मग अनिश्चिततेच्या या झोपळ्यावर झुलत असताना काहीतरी सुरक्षा स्वतःला, नाहीच जमले तर निदान आपल्या प्रिय व्यक्तींना असावी, असं विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी निश्चितच येत असतो. पण प्रत्येक वेळी अगदी पुढच्या 40, 30 किंवा अगदी 20 वर्षांकरिता देखील प्लॅन आखणे, तजवीज करून ठेवणे, प्रत्येकाला शक्य होईलच, असे नाही. पण मग पुढची किमान 10 वर्षे म्हणजे “एक दशक” तुम्हाला निश्चिंत होऊन तुमच्या कुटुंबाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला आवडेल काय !!! मग तुमच्यासाठी “10-year term insurance policy” हा एक संयुक्तिक ऑप्शन उपलब्ध आहे.
बहुतांश लाइफ इन्शुरन्स पॉलिसीज् ह्या 20 वर्षे, 30 वर्षे, अगदी 40 वर्षे इतक्या दीर्घकाळासाठी डिझाइन केलेल्या असतात आणि काही कंपनीज् तर "आजीवन लाईफ कव्हरेज" या फीचर्ससह पॉलिसी प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत आहेत. पण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या /तिच्या सर्वच वयामध्ये खरच एवढे दीर्घकालीन कव्हरेज आवश्यक असते काय !!! आणि जर तुम्ही तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांपासून अपेक्षित वेळेत मुक्त होणार असाल आणि तुम्हाला दीर्घकालीन लाईफ-कव्हर घेऊन “केवळ प्रीमिअमचा भरणा करत राहावा”, असे वाटत नसेल, तर 10 वर्षांची विमा योजना तुमच्यासाठी आहे.
“10 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी” ही योजना कोणासाठी संयुक्तिक असेल ? “10-वर्षांचे लाईफ-कव्हरेज” हा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी काही विशिष्ट आर्थिक व्यवस्था करण्यासाठी एक पुरेसा अवकाश (breathing space) देतो. समजा, आपल्या रिटायरमेंटला 10 किंवा त्याही पेक्षा कमी कालावधी उरला असेल किंवा त्या आधीच आपला निवृत्ती घेण्याचा प्लॅन असेल, तर आपल्या जोडीदाराची आर्थिक सुरक्षितता निश्चित करता येऊ शकते. आपल्या मुलांची शिक्षणं पूर्ण झाली असतील आणि त्यांच्या भवितव्यासाठी फारशी तजवीज करण्याची आवश्यकता नसेल किंवा आपण एखादे छोटेसे कर्ज घेतले असेल, तर त्या घेतलेल्या कर्जाची परतफेड पुढील 10 वर्षांमध्ये सहजपणे होणार असेल इत्यादी, थोडक्यात आपल्या जोडीदाराकरिता फारशा जबाबदाऱ्या मागे नसतील, तेव्हा अशा अल्प-कालीन टर्म इन्शुरन्सचा लाभ घेणे योग्य ठरेल. आणि अगदीच एखादी अकल्पित समस्या 10 वर्षांच्या पॉलिसी-कालावधीमध्ये उदभवल्यास पॉलिसीची क्लेम-अमाऊंट जोडीदारावर देखील अतिरिक्त प्रेशर आणणार नाही.
10 वर्षांच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी पात्र होण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. पॉलिसीधारकाचे वय, लिंग, स्मोकिंग हॅबिट्स, मेडिकल हिस्ट्री, वास्तव्याचा पत्ता, पॉलिसीची रक्कम (Sum Assured), पॉलिसीची टर्म हे सारे घटक प्रीमियमची रक्कम निश्चित करण्यास कारणीभूत ठरत असतात. या प्रकारच्या पॉलिसीमध्ये, पेमेंट फ्रिक्वेन्सीनुसार, आपल्याला नियमितपणे प्रीमियम भरावे लागतात. आणि हा टर्म इन्शुरन्स प्लॅन असल्याने, पॉलिसी टर्म पूर्ण केल्यास कोणताही मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळत नाही.
10 वर्षांचाच टर्म इन्शुरन्स का असावा कारण…
- एकतर, 10 वर्षे एक चांगला आणि प्रभावी कालावधी आहे, आपल्या आयुष्याविषयीचे “Short Term Plans”, ध्येये, निश्चित करण्यासाठी.
- दहा वर्षांसाठी लाईफ-कव्हर निश्चित झालेले असल्याने आपण दुसऱ्या अधिक महत्वाच्या धोरणांवर काम करू शकतो.
- यादरम्यान कोणतीही अतिरिक्त आर्थिक जबाबदारी उरलेली नाही किंवा आपल्याला यापुढे लाइफ-कव्हरची आवश्यकता नाही असे वाटल्यास, आपण पॉलिसी सरेंडर करू शकतो.
- टर्म प्लॅनचे मूलभूत उद्दिष्ट म्हणजे पॉलिसी-टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला "डेथ बेनिफिट" दिले जातात.
- याशिवाय अपघातास सामोरे जावयास लागल्यास भरपाई देणारा “ॲक्सीडेंट रायडर” मिळतो.
- गंभीर आजारांवरील उपचारांच्या खर्चाचे व्यवस्थापन करणारा “क्रिटिकल इलनेस रायडर” मिळतो.
- आपत्कालीन परिस्थिती असल्यास इन्शुरन्स पॉलिसीवर घेता येऊ शकणाऱ्या कर्जाची (loan) सुविधा हे सर्व फीचर्स “10 वर्षांची इन्शुरन्स पॉलिसी” सोबत असतातच.
- शिवाय इन्शुरन्स पॉलिसीसाठी केली जाणारी गुंतवणूक, भरली जाणारी प्रिमिअमची रक्कम ही भारतीय कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत “टॅक्स डिडक्शन” (कर परतावा) करण्यासाठी देखील पात्र असते.