‘If you risk nothing, then you risk everything’, अर्थात जेव्हा तुम्ही कोणतीही जोखीम (risk) स्वीकारत नसता, तेव्हा तुम्ही "आयुष्यातील आव्हानांना सामोरे न जाण्याचा" खूप मोठा धोका स्वीकारत असता. आणि तुम्ही स्वयंरोजगार (Self-employed) किंवा स्वयं-उद्योगी असाल, तर तुम्ही हा "जैसे थे" राहण्याचा (status quo अवस्था), जोखीम (risk) न स्वीकारण्याचा, आव्हाने टाळण्याचा धोका केव्हाच फेकून दिलेला असतो. मात्र "सेल्फ-एम्प्लॉएड" असण्याचे जसे स्वातंत्र्य असते, काही फायदे, काही अधिकार असतात, तसेच त्यासोबत तुमची जबाबदारी (responsibility), तुमचे दायित्व (accountability) देखील खूप जास्त पटींमध्ये वाढलेले असते. "जोखीम जेवढी अधिक, तेवढा फायदा अधिक". मात्र मग त्यासाठी "तितकेच सुरक्षित बॅक-अप" देखील असणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्वयं-उद्योगी व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही जसे स्वतःचे, स्वतःच्या मेहनतीने उभारलेल्या व्यवसायाचे मालक आहात, तसेच तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा देखील प्राथमिक स्रोत तर आहातच, परंतु तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेला जबाबदार असणारी देखील प्रथम व्यक्ती देखील आहात. शिवाय तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरकडून अथवा भविष्य निर्वाह निधीकडून (Provident Fund) नियमित पगार किंवा पेन्शन भत्ता मिळणार नाहीये किंवा तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स, कॉर्पोरेट लाईफ कव्हर असे बेनिफिट्स देखील नसणार आहेत. तेव्हा तुम्हाला अनेकदा उच्च आर्थिक जोखमीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी स्वयं-उद्योगी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने "टर्म इन्शुरन्स पॉलिसी" घेणे, अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे.
टर्म-इन्शुरन्स पॉलिसी हा मुळातच इन्शुरर (इन्शुरन्स कंपनी) आणि इन्शुअर्ड अर्थात पॉलिसीधारक यांच्यातील एक लिखित करार, वचननामा आहे, जिथे इन्शुरन्स कंपनी विशिष्ट कालावधीसाठी निश्चित केल्या गेलेल्या प्रीमियमच्या बदल्यात लाईफ-कव्हर प्रदान करते. आणि पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधी दरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, त्याच्यापश्चात त्याच्या कुटुंबाला किंवा पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला "डेथ-क्लेम" दिला जातो.
सेल्फ-एम्प्लॉएड व्यक्तीचे स्वतःच्या कुटुंबासाठीच्या दायित्वासोबतच व्यवसायप्रती देखील आर्थिक जबाबदाऱ्या निर्माण झालेल्या असतात. दुर्दैवाने एखाद्या अशा पॉलिसीधारकाचा पॉलिसी-टर्मच्या दरम्यान मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीने व्यवसाय-विस्तारासाठी घेतलेली आगाऊ कर्जे-उचलीच्या रक्कमा किंवा पेंडिंग राहिलेली बिल्स डेथ-क्लेमच्या रक्कमेतून फेडली जाऊ शकतात. काही वेळा व्यवसाय चालू ठेवण्याकरिता किंवा मृत पॉलिसीधारक व्यवसायातील भागीदार असल्यास त्याचे भाग-भांडवल ताब्यात घेण्यासाठी देखील या रक्कमेचा उपयोग होतो. उर्वरित रक्कमेतून कुटुंबासाठीची आर्थिक कर्तव्ये देखील पूर्ण करता येतात.
तुम्ही सेल्फ-एम्प्लॉएड असल्यास, तुम्ही तुमच्या स्वतःकरीता "सिंगल प्रीमियम टर्म इन्शुरन्स"चे लाईफ कव्हर घेतल्यास, सुरुवातीला एकदाच प्रीमिअमच्या रक्कम भरून संपूर्ण पॉलिसी-टर्मसाठी सुरक्षित आणि निश्चित होऊ शकता. बरेचवेळा व्यवसायामध्ये होणारे चढ-उतार, अनियमित उत्पन्न, मार्केटमधील तेजी-मंदीचे चक्र यांचा सामना करावा लागतो. तेव्हा रेग्युलर स्वरूपामध्ये प्रीमियमची कमिटमेंट असण्यापेक्षा सिंगल-प्रिमिअमचा पर्याय सुरक्षित तर असतोच, आणि व्यवहार्य देखील ठरतो. सोबत गंभीर आजार किंवा अपंगत्वाकरिता असणारा रायडर घेतल्यास पॉलिसीच्या खरेदीच्या वेळी अगदी नाममात्र अतिरिक्त प्रीमियम भरून “उत्पन्न थांबवू शकणाऱ्या” अशा अनिश्चित घटनांपासून देखील स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला आर्थिकदृष्टया सुरक्षित करू शकता.  
याव्यतिरिक्त तुम्ही भारतीय प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये 1.50 लाखापर्यंतच्या लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्टमधील गुंतवणुकीवर कर वाचवू शकता. तसेच रायडर खरेदी केलेला असल्यास कायद्याच्या कलम 80D अंतर्गत रायडर प्रीमियमवरही वजावट (deduction) म्हणून क्लेम करू शकतो. एवढेच नव्हे तर, तुमच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांना  मिळणारे मृत्यू लाभ पेआउट (Death Claim Amount) देखील प्राप्तिकर कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहे.
“कॅल्क्युलेटेड रिस्क” अर्थात “तोलूनमापून घेतलेली जोखीम / धोका पत्करणे” हा व्यवसाय-चालकाचा अंगभूत DNA असतो. त्यामुळे व्यवसाय चालविताना सोबत उत्पन्नाच्या संधींचे नियोजन करणारा कोणताही उत्तम व्यावसायिक वृत्तीचा स्वयं-उद्योगी स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अनिवार्य असलेली “टर्म-इन्शुरन्स पॉलिसी न घेण्याची जोखीम” नक्कीच घेणार नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            