Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवलीयेत? थांबा, पॅनिक होऊ नका!

Lost Life Insurance Policy

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवली तर निश्चित काही अडचणींना सामोरे जावे लागते. पण तुम्ही जर रितसर याचा पाठपुरावा केला तर तु्म्हाला इन्शुरन्स कंपनीकडून डुप्लिकेट पॉलिसी मिळवता येते.

इंग्रजीमध्ये  “From Womb to Tomb” किंवा “From Cradle to Grave” म्हणतात, त्या मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये काही कायदेशीर डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ, जन्माचा दाखला, शाळा-कॉलेज सोडल्याचा दाखला, डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र, आधार कार्ड-पॅन कार्ड सारखी ओळखपत्रे, मालमत्तेची खरेदीखते आणि आयुष्याच्या अखेरीस बनले जाणारे ‘डेथ सर्टिफिकेट’ अर्थात मृत्यूचा दाखला. याचबरोबर एक तितकेच महत्त्वाचे कायदेशीर करारपत्र म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंट (Insurance Policy Document).

इन्शुरन्स कंपनीने (Insurer) पॉलिसीधारकाला (Insured) पॉलिसी खरेदी करताना इन्शुरन्स पॉलिसी डॉक्युमेंटची प्रत्यक्ष प्रत (Physical copy) सुपूर्द केलेली असते. पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर किंवा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, क्लेमच्या रकमेसाठी दावा करताना इतर कागदपत्रांसह जोडलेली मूळ प्रत इन्शुरन्स पॉलिसीच्या खरेदीदाराने किंवा त्याच्या नॉमिनीने सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट्स अबाधित ठेवावे लागतात आणि क्लेम सेटलमेंट प्रोसेसच्या वेळी इन्शुररला परत करावी लागतात.

पण मग इतकी महत्त्वाची डॉक्युमेंट्स गहाळ झाली तर काय?

सर्वप्रथम डॉक्युमेंट्स हरविल्याची खात्री करून घ्या आणि लागलीच इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा. जर पॉलिसी तुम्ही इन्शुरन्स-एजंट मार्फत खरेदी केली असेल, तर एजंटला डॉक्युमेंट्स हरविले असल्याच्या परिस्थितीबद्दल माहिती देऊन ठेवा.

थांबा, पॅनिक होऊ नका! 

शक्य झाल्यास इन्शुरन्स कंपनीच्या जवळच्या शाखेला भेट द्या आणि झालेल्या नुकसानीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना द्या. परंतु, डुप्लिकेट पॉलिसीसाठी अर्ज करण्यापूर्वी, आपल्याकडील सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. बहुतेक प्रकरणांमध्ये, हक्क सांगणाऱ्या पक्षाला डुप्लिकेट डॉक्युमेंट्स साठीचा विनंती अर्ज सबमिट केल्यानंतर मूळ कागदपत्रे सापडतात. आजकाल इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीधारक व्यक्तीला पाठवलेल्या पॉलिसीबाबत ई-मेलही पाठवले जाते. अशा प्रकरणात, ई-मेल शोधून त्यानुसार सुद्धा विनंती केली जाऊ शकते.


 डुप्लिकेट कॉपीसाठी अर्ज करा!

पॉलिसी-डॉक्युमेंट्सची दुय्यम प्रत (Duplicate Copy) मिळविण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे, तुम्हाला पुढील तपशीलांचा उल्लेख करणारा अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे : पॉलिसीधारकाचे नाव पूर्ण, पॉलिसी क्रमांक, पॉलिसी जारी करण्याची तारीख, लाईफ कव्हरचा प्रकार, पॉलिसी बाँड कोणत्या परिस्थितीत हरविले असावेत (उदाहरणार्थ - प्रवास, पूरस्थिती, भूकंप, चोरी) आदी माहिती द्यावी लागते. संयुक्त जीवन विमा म्हणजे Joint Insurance Policy बाबतीत, अर्ज संयुक्तपणे सबमिट करणे आवश्यक असते. काही इन्शुरन्स कंपन्या डुप्लिकेट डॉक्युमेंट्स पुरविण्यासाठी नाममात्र शुल्क आकारू शकतात.


पोलिसांत तक्रार दाखल करा

पॉलिसी डॉक्युमेंट्स हे अत्यंत महत्वाचे कायदेशीर करार-पत्र असल्याने तात्काळ पोलीस  तक्रार करणे संयुक्तिक ठरेल. पोलीस तक्रार केल्याच्या अहवालाची (FIR - First Information Report) प्रत Duplicate Copy साठी केलेल्या अप्लिकेशन सोबत जोडल्यास दुय्यम प्रत मिळण्यास गती मिळते.  गहाळ झालेले पॉलिसी डॉक्युमेंट्स  शोधण्यासाठी इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील वर्तमानपत्रामध्ये त्याबद्दलची जाहिरात देणे, आणि अशी जाहिरात दिलेली असल्याची प्रत इन्शुरन्स कंपनीकडे सबमिट करणे, ही देखील एक प्रचलित पद्धत आहे.

नुकसानभरपाई  बाँडची माहिती घ्या!

इंडेम्निटी बॉण्ड - सामान्यतः इन्शुरन्स कंपनी आणि हरवलेल्या कागदपत्राचा मालक अर्थात पॉलिसीधारक यांच्यात गैर-न्यायिक (Non-Judicial) स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करून एक नुकसानभरपाई बाँड केला जातो. Duplicate Policy Documents पुरविले जाण्याच्या प्रक्रियेत मूळ दस्तऐवजाचा कोणताही गैरवापर होणार नाही, हे प्रमाणित करण्यासाठी “नुकसानभरपाई  बाँड” (Indemnity Bond) सबमिट करावा लागतो. त्यावर इन्शुरर आणि पॉलिसीधारक, या दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केलेली पाहिजे. हा बाँड सुरक्षित ठेवला पाहिजे आणि नॉमिनींना बाँडची माहिती असावी.

नुकसानभरपाई बाँडद्वारे आर्थिक संरक्षण मिळवा

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी इन्शुरन्स कंपनीला “इंडेम्निटी बाँड”वर स्वाक्षरी करण्याची विनंती करू शकतो, ज्यामध्ये सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केल्या जातात आणि या आधारावर दाव्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. तसेच मूळ दस्तऐवजाच्या गैरवापरामुळे तुमच्या इन्शुरन्स कंपनीला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून नुकसानभरपाई बाँड संरक्षण करतो. यामध्ये असे देखील नमूद केलेले असते की, जर तुम्हाला मूळ पॉलिसी दस्तऐवज सापडला तर तुम्ही ते तुमच्या इन्शुरन्स कंपनीला परत कराल. तसेच यामध्ये कोणतीही फसवणूक नसून मूळ कागदपत्रे इतर कोणत्याही पक्षाच्या ताब्यात नाहीत.

डुप्लिकेट कॉपीची नीट पडताळणी करून घ्या!

एकदा तुम्ही असे केल्यावर, तुमची इन्शुरन्स कंपनी, सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर, तुमच्या पॉलिसी बाँडची डुप्लिकेट प्रत जारी करते. दस्तऐवजावर 'DUPLICATE' हा शब्द ठळकपणे प्रदर्शित केलेला असतो. मिळालेल्या डुप्लिकेट दस्तऐवजाच्या तपशीलांची क्रॉस-तपासणी करा आणि कोणतीही विसंगती तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या निदर्शनास त्वरित आणा. इन्शुरन्स कंपनीने Duplicate Policy Documents पुरविल्यानंतर, पॉलिसीधारक किंवा नॉमिनी, इन्शुरन्स कंपनीकडे  क्लेमच्या रक्कमेचे वितरण करण्याची विनंती सुरू शकतो.

तुमच्यासोबत काही दुर्दैवी घटना घडल्यास लाइफ इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य पुरवते. पॉलिसीधारक म्हणून, तुमचे पॉलिसी-बाँड सुरक्षित ठेवणे तुमचे प्रथम कर्तव्य आहे. क्लेम-सेटलमेंट प्रक्रिये दरम्यान, तुम्ही किंवा तुमच्या नॉमिनीला मूळ पॉलिसी बाँड सादर करणे आवश्यक असते. तुम्ही तुमची पॉलिसी सुरक्षितपणे कुठे ठेवली आहे ? हे तुमच्या नॉमिनीला देखील माहीत आहे, याची नेहमी खात्री करा.