Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Extended Thane Station Project: विस्तारित 'ठाणे स्टेशन' प्रकल्प का रखडलाय तुम्हाला माहित आहे का?

Extended Thane Station Project

Image Source : indiarailinfo.com

Extended Thane Station Project: साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्टेशन असावे अशी मागणी जोर धरू लागली. मेट्रोचे जाळे उभारत असताना या नवीन स्टेशनमुळे प्रवाशांना आणखी एक नवीन पर्याय मिळणार असल्याने मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने विस्तारित ठाणे स्टेशनचा प्रस्ताव पुढे आणला.

Extended Thane Station Project: ठाणेकरांच्या विकासासाठी विस्तारित ठाणे स्टेशन प्रकल्प गेली 8 वर्षे न्यायालयीन याचिकेच्या कचाट्यात सापडला आहे. ठाणे आणि मुलुंड(Mulund) दरम्यान नवीन स्टेशन असावे अशी मागणी जोर धरू लागली होती. तसा प्रस्तावही मांडण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी हे स्टेशन उभारले जाणार होते त्या जागेच्या वादावरून हे प्रकरण रखडले होते. या विस्तारित ठाणे स्टेशनसाठी निश्चित करण्यात आलेल्या मनोरुग्णालयाच्या(Psychiatric Hospital) जागेवरील हरकतीवरील याचिकेवर येत्या गुरुवारी 12 जानेवारीला सुनावणी होणार असल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. या सुनावणीमध्ये आपल्या बाजूने कौल लागेल, अशी अपेक्षा ठाणे पालिकेने व्यक्त केली असून तसे झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला विस्तारित ठाणे स्टेशन दृष्टिपथात येईल. चला तर याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

काय आहे विस्तारित ठाणे स्टेशन प्रकल्प?(Extended Thane Station Project?)

ठाणे स्थानकाची कोंडी फोडून प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी ठाणे आणि मुलुंड(Mulund) दरम्यान नवीन स्टेशन(New Station) असावे अशी मागणी जोर धरू लागली. मेट्रोचे जाळे उभारत असताना या नवीन स्थानकामुळे प्रवाशांना आणखी एक नवीन पर्याय मिळणार असल्याने मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने विस्तारित ठाणे स्टेशनचा प्रस्ताव पुढे आणला. त्यासाठी प्रकल्पाची आखणी करून ठाणे मनोरुग्णालयाची(Psychiatric Hospital) जागा निश्चितही  करण्यात आली. पण या जागेसाठी अगोदर आरोग्य विभागाचा अडथळा होता, त्यातून मार्ग निघतो न निघतो तोच काँग्रेसच्या महिला पदाधिकारी के. वृषाली(K. Vrushali) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेने मोठी समस्या निर्माण केली.

हा प्रकल्प का रखडला?(Why was this project stalled?)

मनोरुग्णांना निकृष्ट जेवण मिळत आहे या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी के. वृषाली यांनी 8 वर्षांपूर्वी न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्याच वेळी या प्रकरणामध्ये  विस्तारित ठाणे स्टेशनचा मुद्दा समोर आला. मनोरुग्णालयाला(Psychiatric Hospital) ही जमीन दान स्वरूपात मिळाली होती. ज्या उद्देशाने ती जमीन दान करण्यात आली, तेथे विस्तारित ठाणे स्टेशन उभारणे चुकीचे असल्याची याचिका के. वृषाली(K. Vrushali) यांनी मुंबई उच्च न्यायालयात(High Court, Mumbai) दाखल केली, मात्र त्यावर सुनावणी अद्याप होऊ शकलेली नाही. 1 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाची होणारी सुनावणी परत एकदा लांबवणीवर गेली, पण यादरम्यान राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीAshutosh Kumbhakoni) यांनी राजीनामा दिल्याने यापदी ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ(Dr. Birendra Saraf) यांची नियुक्ती झाली आणि या याचिकेच्या सुनावणीला 12 जानेवारीचा अखेर मुहूर्त मिळाला. त्यामुळे पालिका आणि मध्य रेल्वेला आशा आहे की, न्यायालय योग्य तो निर्णय घेईल.

तात्काळ कामाला लागणार...(Will be working immediately)

स्मार्ट सिटी(Smart City) अंतर्गत विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशन उभारण्याचा ठाणे महापालिकेचा विचार आहे. विस्तारित ठाणे रेल्वे स्टेशनची जबाबदारी मध्य रेल्वेची असली तरी त्यामध्ये अपेक्षित सोयी-सुविधा उभारण्याचा विडा ठाणे महापालिकेने उचलला आहे. त्याकरिता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 289 कोटी खर्चाची रक्कम अंदाजे वर्तवली जात आहे. जर निर्णय पालिकेच्या बाजूने लागला तर तात्काळ कामाला लागण्याची तयारी स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकारी सहआयुक्त संदीप माळवी(Sandip Malavi) यांनी दाखवली आहे.