Mukesh Ambani's salary: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे(Reliance Industries Limited) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांना कोणत्याही विशेष परिचयाची गरज नाही, कारण हे नाव आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून त्यांचा नावलौकिक कायम आहे. मुकेश अंबानी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात मात्र सध्या मुकेश अंबानी बेस्ट सीईओ(Best CEO) म्हणून चर्चेत आले आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अंबानींना किती पगार मिळतो, तर एका दिवसाला मुकेश अंबानींना 1,93,09,71,839.33 (1 अब्ज 93 कोटी, 9 लाख, 71 हजार 839 पूर्णंक 33) रुपये इतका पगार मिळतो. मग तुम्ही म्हणाल महिन्याला किती? आणि त्यांचं शिक्षण काय? हे सर्व जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
ब्रँड व्हॅल्युएशन कन्सल्टन्सी ब्रँड फायनान्सद्वारे(brand valuation consultancy Brand Finance) दरवर्षी टॉप सीईओ(Top CEO) असा अहवाल प्रकाशित केला जातो. ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे ब्रँड फायनान्सच्या जगातील टॉप सीईओंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याच निमित्ताने त्यांचे शिक्षण आणि त्यांना मिळणार पगार जाणून घेऊयात.
मुकेश अंबानींचे शिक्षण(Education of Mukesh Ambani)
आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचे शालेय शिक्षण मुंबईतील हिल ग्रेंज हायस्कूलमधून(Hill Grange High School) झाले आहे. नंतर, त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयात(St. Xavier's College, Mumbai) पुढील शिक्षण घेतले. पदव्युत्तर स्तरावर, त्यांनी रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई(BE) पदवी पूर्ण केली. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अंबानी यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात(Stanford University) एमबीएसाठी प्रवेश घेतला परंतु 1980 मध्ये धीरूभाई अंबानींनी रिलायन्स उभारण्यासाठी त्यांनी परत भारतात बोलावले, त्यामुळे त्यांनी एमबीए(MBA) करणे बंद केले.
मुकेश अंबानींना किती पगार मिळतो?(How much get salary?)
लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मुकेश अंबानींना नेमका किती पगार मिळतो हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच सगळ्यांना असते. पण त्यांच्या पगाराचा आकडा वाचलात तर नक्कीच तुमचे डोळे चकाकतील. Paycheck.in या वेबसाईटने 2023 मधील मुकेश अंबानी यांचा वार्षिक, मासिक, आठवड्याचा आणि दिवसाचा पगार किती आहे याबद्दल माहिती दिली आहे. Paycheck.in च्या माहितीनुसार मुकेश अंबानी वर्षाला 5,02,05,26,78,227.00(502अब्ज 5 कोटी, 26 लाख, 78 हजार 227) रुपये इतका पगार घेतात. तर त्यांना महिन्याला 41,83,77,23,185.58(41 अब्ज, 83 कोटी, 77 लाख, 23 हजार 185 पूर्णांक 58) रुपये पगार आहे. मग तुम्ही म्हणाल एका आठड्यासाठी मुकेश अंबानींना किती पगार मिळतो? तर एका आठवड्यासाठी 9,65,48,59,196.67(9 अब्ज, 65 कोटी, 48 लाख, 59 हजार, 196 पूर्णांक 67) रुपये इतका पगार त्यांना मिळतो. तर एका दिवसाचा त्यांचा पगार 1,93,09,71,839.33(1 अब्ज 93 कोटी, 9 लाख, 71 हजार 839 पूर्णंक 33) रुपये इतका आहे.