Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mukesh Ambani : BGI 2023 मध्ये भारतात अव्वल, जगात दुसऱ्या क्रमांकावर

Mukesh Ambani

Image Source : www.bloomberg.com

बिझनेस वर्ल्डमध्ये स्वत:चे मजबूत स्थान असलेले Mukesh Ambani यांनी आणखी एक दखलपात्र कामगिरी केली आहे. BGI 2023 मध्ये अव्वल ठरत असताना त्यांनी Microsoft चे सत्या नडेला आणि Google चे सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे.

ब्रँड फायनान्सने 2023 च्या अहवालात म्हटले आहे की, 'आम्ही एक संतुलित निर्देशांक तयार केला आहे. हा  Brand Guardianship Index 2023 सीईओंच्या क्षमतेचे मोजमाप करतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आणि गुगलचे सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे. या निर्देशांकात मुकेश अंबानी भारतात पहिल्या तर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ब्रँड फायनान्सने ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स प्रमाणेच स्वतःचा ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स तयार केला आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स कंपनीच्या कॉर्पोरेट ब्रँड मूल्यांकनाची रूपरेषा दर्शवते.
ब्रँड फायनान्सने आपल्या 2023 च्या अहवालात म्हटले आहे की, 'आम्ही संतुलित निर्देशांक तयार केला आहे. हे कंपनीचे पालक म्हणून काम करण्यासाठी आणि दीर्घकालीन भागधारक मूल्य चालविण्याच्या कंपन्यांच्या सीईओंच्या क्षमतेचे मोजमाप करते.

Nvidia CEO जेन्सेन हुआंग प्रथम

Nvidia चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग प्रथम आले आहेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी ब्रँड फायनान्सच्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स (BGI) 2023 मध्ये दुसर्‍या स्थानावर आहेत," असे अहवालात म्हटले आहे.या दोघांनी पहिले दोन स्थान पटकावले असून, गेल्या वर्षीचे  टॉपर मायक्रोसॉफ्टचे  सत्या नाडेला तिस-या क्रमांकावर आहेत.

भारतीय जास्त  

निर्देशांकातील टॉप 10 लोकांपैकी बहुतांश भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. Adobe चे शंतनू नारायण चौथ्या तर सुंदर पिचाई पाचव्या स्थानावर आहेत. डेलॉइटचे पुनीत राजन सहाव्या तर टाटा समूहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन आठव्या क्रमांकावर आहेत. DBS चे पियुष गुप्ता नवव्या स्थानावर आहेत तर Tencent चे Huateng Ma 10 व्या स्थानावर आहेत. महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा 23 व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 40 वर्षांपासून ते गटप्रमुखाच्या भूमिकेत आहेत. कंपनीचे पालक म्हणून काम करण्यासाठी आणि दीर्घकालीन भागधारक मूल्य चालविण्याच्या कंपन्यांच्या सीईओंच्या क्षमतेचे मोजमाप BGI हा निर्देशांक करतो.