Nusli Wadia Murder Conspiracy: 'रिलायन्स इंडस्ट्रीज(RIL)' या कंपनीचे निर्माते आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून धीरूभाई अंबानींना(Dhirubhai Ambani) ओळखलं जातं. अथक परिश्रम करून धीरूभाईंनी ही कंपनी उभारली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांना नाव, पैसा आणि प्रसिद्धी तर मिळालीच पण तुम्हाला ठाऊक आहे का? धीरूभाई अंबानींवर एका व्यक्तीच्या हत्येच्या कटाचा आरोप लावण्यात आला होता आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजले होते. नक्की काय होतं हे प्रकरण चला तर जाणून घेऊयात.
नुस्ली वाडिया हत्येचा आरोप
बॉम्बे डाईंगचे चेअरमन नुस्ली वाडिया(Nusli Wadia) यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप धीरूभाईंवर(Dhirubhai Ambani) करण्यात आला होता. हे प्रकरण 1988-89 मध्ये खूप गाजले होते. 'कॉर्पोरेट शत्रुत्त्वामुळे' नुस्ली वाडिया यांची हत्त्या करण्यात धीरूभाईंचा हात आहे असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. ही केस साधारण 10 वर्ष खदखदत होती. यादरम्यान धीरूभाईंची आणि रिलायन्स इंडस्ट्रीची(RIL) खूप नाचक्की झाली होती. या केसचा कार्यकाळ 10 वर्षापर्यंत चालला ज्याचा प्रचंड मनस्ताप धीरूभाईंना सहन करावा लागला. याच दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका(Heart Attack) देखील आला होता.
कीर्ती अंबानी कोण?
रिलायन्स इंडस्ट्रीजमधील वरिष्ठ अधिकारी कीर्ती अंबानी(Kirti Ambani) या प्रकरणातील प्रमुख आरोपी होत्या. या प्रकरणाचा प्रथम तपास मुंबई पोलिसांनी(Mumbai Police) केला आणि नंतर हे प्रकरण सीबीआयच्या(CBI) ताब्यात देण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान "कीर्ती अंबानी या महाव्यवस्थापक असल्याने त्यांचा नुस्ली वाडिया सारख्या मोठ्या उद्योगपतीविरुद्ध द्वेष कसा असू शकतो? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काहींच्या मते कीर्तीनी धीरुभाईंवरील आरोप स्वतःवर घेतला असल्याचे सांगितले जाते.
त्यावेळी सत्ताधारी पक्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची कारकीर्द होती. रिलायन्सचे प्रस्त एवढे मोठे होते की पवारांची खुर्ची देखील धोक्यात आली होती. त्यावेळी वाडिया यांना रामनाथ गोएंका याचे सहकार्य मिळाले होते. त्यांच्या मदतीमुळे गोएंकांच्या मालकीची असणाऱ्या इंडियन एक्सप्रेस(Indian Express Newspaper) वृत्तपत्रातून धीरूभाईंविरुद्द लेख मालिका(Article Series) प्रसिद्ध करण्यात आली होती. हा काळ धीरूभाईंसाठी अतिशय अवघड होता.