Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुम्हाला मोफत विम्याविषयी माहीत आहे का?

तुम्हाला मोफत विम्याविषयी माहीत आहे का?

दैनंदिन जीवनात आपण काही अत्यावश्यक उत्पादने खरेदी करत असतो. त्या उत्पादनांच्या माध्यमातून संबंधित ग्राहकाला विमा पॉलिसीचा मोफत लाभ (hidden insurance policies) मिळत असतो. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीने भविष्यातील आर्थिक सुरक्षा पाहता किमान एक जीवन विमा (Life Insurance) पॉलिसी खरेदी करायला हवी. पण तरीही विमा पॉलिसी खरेदी करण्याबाबत आपण गंभीर नसाल तर चिंतेचे कारण नाही. कारण काही विमा पॉलिसी अशाही असतात की, त्या वस्तू आणि सेवा खरेदी केल्यानंतर आपोआप लागू होतात किंवा मिळतात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. अशा प्रकारच्या पॉलिसीला हिडन इन्शूरन्स (Hidden Insurance) म्हणतात. सर्वसाधारणपणे यासंदर्भात लोकांना फारशी माहिती नसते. आज आपण या हिडन इन्शूरन्स संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

हिडन इन्शूरन्स म्हणजे काय? What is Hidden Insurance?

शब्दातूनच तुमच्या लक्षात येईल की, हिडन म्हणजे लपलेला. या लपलेल्या विम्याचा हप्ता हा एखादी वस्तू किंवा सेवेच्या मूल्यांत लपलेली असते. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या विमा कवच संदर्भात सर्वसामान्य व्यक्तींना फार कमी माहिती असते. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या कामात आणि धावपळीत इतका व्यस्त असतो की, आपल्याला मोफत विमा मिळतो, हे देखील त्याला ठाऊक नसते. उदा. विमानाचे-रेल्वेचे तिकीट, एटीएम कार्ड, बँक खाते इत्यादी. यासारखी अनेक उत्पादने आणि सेवा आहेत; ज्यांच्या खरेदीवर जीवन विमा (Life Insurance) मोफत मिळतो. एखादा व्यक्ती अशा प्रकारची सेवा आणि उत्पादन घेत असेल तर त्याने अशा लपलेल्या विम्याबाबत जाणून घेणं आवश्यक आहे.

घरगुती उपकरणांच्या खरेदीवर विमा कवच

एखादा व्यक्ती घरगुती उपकरणं जसे की, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अन्य वस्तू खरेदी करत असेल तर त्यावर निर्यात कंपनी ग्राहकाला त्या वस्तूच्या आधारे विमा कवच प्रदान करते. परंतु यासंदर्भातील माहिती फार कमी लोकांना असते. अशा प्रकारचे विमा कवच हे सामान्यपणे उत्सवाच्या काळात प्रदान केले जाते. अर्थात त्यासाठी जादा हप्ता घेतला जात नाही. पण विम्याचा खर्च हा वस्तूच्या किमतीत सामील केला जातो. याप्रमाणे विमा हा गॅरंटी आणि वॉरंटीशिवाय असतो.

गॅस सिलिंडरवर जोखीम कवच

घरगुती गॅस सिलिंडर सेवा देणार्‍या कंपन्यादेखील नोंदणीकृत ग्राहकांना गॅसमुळे हेाणार्‍या दुर्घटनेपासून होणार्‍या आर्थिक आणि मानवी नुकसानीला संरक्षण देण्यासाठी विमा कवच देतात. या विम्याबाबत बऱ्याच लोकांना माहिती नसते. लहानसहान दुर्घटनांसंदर्भातील माहितीदेखील कंपनी किंवा वितरक ग्राहकांना सांगत नाहीत. याप्रकारच्या विम्यात कमाल 40 लाखांपर्यंत विमा कवच दिले जाते.

स्मार्टफोनवर कवर

स्मार्टफोन तयार करणार्‍या कंपन्या विक्री वाढविण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर फोनचा विमा मोफतपणे उपलब्ध करून देत आहेत. फोन चोरी गेल्यास, हरविल्यास किंवा तुटल्यास स्मार्टफोन कंपनी मोफतपणे फोन रिप्लेस करते किंवा दुरुस्त करून देते.

प्रवासाची जोखीम

प्रत्येक प्रवाशाला बस, रेल्वे, विमान प्रवासात विमा कवच असते. सामान गहाळ झाल्यास, आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास, आर्थिक नुकसान झाल्यास विम्याच्या माध्यमातून प्रवाशांना भरपाई दिली जाते. बस, रेल्वे, हवाई प्रवासातील विम्याचा हप्ता हा खूपच कमी असतो. बससाठी वेगवेगळ्या राज्यांत विम्याची रक्कम वेगवेगळी असते. काही राज्यात बस प्रवाशांना दोन लाखांपर्यंतचा मोफत जीवना विमा मिळतो. तर काही राज्यांत पाच ते दहा लाखांपर्यंतचे सुरक्षा कवच मिळते. रेल्वे प्रवाशाना देखील विमा कवच असते. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकींग करताना तिकीटामधून खूपच किरकोळ स्वरूपात विम्याचा हप्ता वसूल केला जातो. याप्रमाणे विमानातून प्रवास करताना देशांतर्गत प्रवासात 50 लाख रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासात एक कोटींपर्यंतची विमा सुरक्षा दिली जाते. या विम्याच्या हप्त्याची रक्कम तिकीटातून अगोदरच घेतलेली असते.

बँकेतील जमा रक्कमेचा विमा

देशातील सर्व बँका आपल्या ग्राहकांना खात्यात जमा असलेल्या रकमेवर आणि मुदत ठेवीवर मोफत विमा देतात. बँकेकडून एखादी सेवा स्थगित केली जाते किंवा बँक बंद होत असेल तर खातेधारक जमा रक्कम ही व्याजासकट मिळवण्यासाठी दावा करू शकतो. एखादी बँक बंद पडली असेल आणि त्या व्यक्तीचे बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर त्याची संपूर्ण रक्कम ही या विम्या योजनेनुसार मिळते. पण त्याचे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत असेल तर त्याला पाच लाखांपर्यंतच विमा कवच मिळेल. या विम्यापोटी बँका अगदी किरकोळ पैसे हप्ता म्हणून घेत असतात.

अशाप्रकारे, तुम्ही वेगवेगळ्या उत्पदानांच्या खरेदीतून नकळत विम्याचा लाभ मिळवू शकता. पण यासाठी तुम्हाला अधिक जागृत राहणं आवश्यक आहे.