गेल्या वर्षी भारतात अपघाती मृत्यूंची संख्या 4 लाखांच्या जवळपास होती. अपघाती विमा म्हणजे Accident Insurance. ही पॉलिसी काही प्रमाणात आपले मानसिक आणि शारीरिक नुकसान भरून काढण्यास मदत करतात.
आर्थिक संरक्षण
एखादा मोठा किंवा किरकोळ अपघात, तुम्हाला तात्पुरते किंवा कायमचे अक्षम करू शकतो. यामुळे तुमची आर्थिक क्षमता कमी होवू शकते. यामुळे तुमची अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे धोक्यात येऊ शकतात. वैयक्तिक अपघात विमा तुमच्या उत्पन्नाच्या ऐवजी आधार म्हणून काम करून तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून संरक्षण करतो. तुम्ही कोणत्या प्रकारचा विमा निवडता आणि अपघात कशा प्रकारचा आहे यावर विम्याची रक्कम बदलते. ही रक्कम तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चाची काळजी घेण्यास मदत करतेच पण तुमच्या जबाबदाऱ्या सहज पूर्ण होतील याचीही खात्री देते. तात्पुरत्या अपंगत्वाच्या बाबतीत , तुम्ही तंदुरुस्त होईपर्यंत आणि तुम्ही कामावर रुजू होईपर्यंत ही पॉलिसी तुमचा दुसरा आर्थिक म्हणून काम करते.
सर्वसमावेशक रक्कम
मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वैयक्तिक अपघात विम्याच्या रकमेच्या 100% रक्कम देते. तात्पुरत्या अपंगत्वाच्या बाबतीत देय रक्कम ही विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी असते. ही टक्केवारी विविध अवयवांच्या अपंगत्वानुसार बदलते. अशा पॉलिसीमुळे तुम्हाला हॉस्पिटलायझेशनचा एकंदर खर्च आणि रुग्णवाहिकेचा खर्च भागवता येतो. अतिरिक्त प्रीमियम भरून याचा लाभ घेता येईल.
- अपघाती मृत्यू लाभ – पॉलिसी धारकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत विमा कंपनी नॉमिनीला संपूर्ण विम्याची रक्कम देते.
- कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व - या प्रकरणात विम्याच्या रकमेची काही टक्के रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते.
- कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व - या प्रकारच्या अपघातात पॉलिसी धारकाला साप्ताहिक किंवा मासिक विमा रकमेची थोडीशी टक्केवारी दिली जाते. जसे की, एका कानाने ऐकू न येणे, बोटे तुटणे, एक हात निकामी होणे आदी कारणांसाठी रक्कम दिली जाते.
- तात्पुरते अपंगत्व - ज्या प्रकारच्या अपघातांमुळे तुम्हाला तात्पुरते अपंगत्व येउन तुम्ही 104 आठवड्यांपर्यंत जायबंदी होता. तेव्हा तुम्हाला साप्ताहिक लाभ ह्या विम्याद्वारे मिळु शकतो. उदाहरण: हात किंवा पाय फ़्रैक्चर होणे.
- शैक्षणिक अनुदान - पॉलिसी 23 वर्षांपर्यंतच्या जास्तीत जास्त दोन अवलंबुन असलेल्या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलते.
- नश्वर अवशेषांची वाहतूक - अपघाती मृत्यूसारख्या दुर्दैवी घटनेत विमा कंपनी मृत अवशेषांच्या वाहतुकीसाठी एक निश्चित रक्कम देते.
वैयक्तिक अपघात विमा अपघात झाल्यास आर्थिक नुकसानीपासून तुमचे संरक्षण करतो. पण अशा पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, अशा विमा पॉलिसीमध्ये पूर्व-अस्तित्वात असलेले अपंगत्व, स्वत:ला झालेल्या दुखापती, आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्या यांचा समावेश होत नाही. तसेच, ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या प्रभावाखाली अपघात समाविष्ट नाहीत. याव्यतिरिक्त, गुन्हेगारी हेतूने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, एड्स/एचआयव्ही, दहशतवादी हल्ल्यामुळे आलेला मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याची रक्कम देय नसते.