Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मोबाईलचा विमा काढणं खरंच गरजेचं आहे का? - Mobile Insurance Plan 2022

मोबाईलचा विमा काढणं खरंच गरजेचं आहे का? - Mobile Insurance Plan 2022

Image Source : www.techulator.com

Mobile Insurance - जर तुमचा मोबाईल तुटला किंवा खराब झाला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलसाठी सर्वोत्तम मोबाईल विमा पहा आणि आर्थिक नुकसान कमी करा.

मोबाईल किंवा स्मार्टफोन हा आज आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. संवाद साधण्याबरोबरच विविध प्रकारच्या कामासाठी आपण त्यावर अवलंबून आहोत. अशावेळी आपला स्मार्टफोन खराब होणं, बंद पडणं, चोरीला जाणं किंवा हरवणं हे आपल्याला परवडणारे नाही. यामुळे आपल्या कामात मोठा व्यत्यय येऊ शकतो. अशावेळी आपले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मोबाईल विम्याची निवड करू शकते.

मोबाईल विमा म्हणजे काय?

मोबाईल हरवला किंवा तुटला, की त्यातील डेटा हरवला किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आर्थिक नुकसानीसह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आजकाल, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च केले जातात. त्यामुळे मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर मोठे नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी विमा कंपन्यांकडून मोबाईल विमा उतरवला जातो. हे विमा स्मार्टफोनसह सर्व प्रकारचे फोन चोरी किंवा अचानक हरवण्यापासून संरक्षण देतात.

मोबाईल विमा कशाप्रकारे संरक्षण पुरवतं?

  • स्मार्ट फोन चोरीला गेल्यास 
  • 48 तासांच्या आत हरवलेला किंवा खराब झालेला फोन बदलून किंवा दुरुस्त करून दिला जातो
  • अचानक झालेल्या नुकसानापासून संरक्षण
  • दुरुस्तीसाठी मोबाईल फोनची डोअर स्टेप पिक आणि ड्रॉप सुविधा
  • कव्हरेजसाठी कॅशलेस प्रक्रिया
  • इअर जॅक, चार्जिंग पोर्ट आणि टच-स्क्रीन यांसारख्या तांत्रिक समस्याही काही कंपन्या कव्हर करतात
  • काही विमा कंपन्या पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी पॉलिसीधारकाला पूर्वीच्या पॉलिसीच्या मुदतीत कोणताही दावा न केल्यास त्यांना क्लेम बोनस देतात.

मोबाईल विम्यासाठी दावा प्रक्रिया

मोबाइल विमा दाव्याची प्रक्रिया कंपनीनुसार बदलू शकते. पण त्यातील काही कॉमन टप्पे आपण पाहुयात.

  • मोबाईल फोनचे कोणतेही नुकसान झाल्यास टोल-फ्री क्रमांक किंवा कस्टमर केअरद्वारे विमा कंपनीला कळवा.
  • विम्याचा दावा करण्यासाठी ऑनलाईन किंवा विमा कंपनीच्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल.
  • फोनची चोरी झाल्यास किंवा हरवल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा आणि त्याची कॉपी विम्याच्य अर्जासोबत जोडा.
  • घरात लागलेल्या आगीमुळे मोबाईल फोनचे नुकसान झाल्यास काही विमा कंपन्यांना अग्निशमन दलाचा अहवाल सादर करावा लागतो.
  • विम्याचा दावा करताना कंपनीला मोबाईल खराब झाल्याची छायाचित्रे पाठवावी लागतात.
  • काही विमा कंपन्या मोबाईल दुरुस्तीचे पैसे थेट अधिकृत केलेल्या थर्ड पार्टी मोबाइल दुरुस्ती केंद्रांना पाठवतात.
  • काही विमा कंपन्या प्रति पॉलिसी फक्त एक क्लेम देतात तर काही एकापेक्षा जास्त क्लेम ऑफर देतात. म्हणून मोबाईल विमा पॉलिसीच्या अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. मोबाईल विकत घेतल्याची मूळ पावती
  2. फोनचा सिरिअल क्रमांक
  3. विमा पॉलिसी क्रमांक 
  4. एफआयआरची प्रत (फोन हरवल्यास, चोरीला गेल्यास)

मोबाईल विमा कंपन्या

मोबाईल विमा खरेदी करताना विमा कंपन्यांच्या काही अटी असतात. जसे की, मोबाईल मालकाचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. विमा नोंदणी मोबाईल वापरकर्त्याच्या नावावरच  केली जाते. त्याचबरोबर विमा खरेदी करताना मोबाईल खरेदीची तारीख आणि मोबाईल फोनचा IMEI क्रमांक द्यावा लागतो. भारतात सिस्का गॅझेट सिक्युर (syska gadget secure), टाइम्स ग्लोबल (Times Global), डिजिट-गो (digit go), वन असिस्ट (OneAssist), वनसाईट गो (OnsiteGo), सिंकस्कॅम (SyncScan), होम क्रेडिट (Home Credit), वारंटी बाजार (Warranty Bazar) या काही मोबाईल विमा सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत. याची सविस्त माहिती व किंमत इंटरनेटवर मिळू शकते.