DMart Yearly Revenue : आपल्या शहरातील काही भागात आपण DMart रिटेल शॉप बघतो. दैनंदिन गरजेच्या बऱ्याच वस्तु आपल्याला यामधुन मिळतात. शिवाय कपडे आणि फॅशनच्या इतरही अनेक वस्तु इथे मिळतात. त्यामुळे या मार्ट मध्ये नेहमीच प्रचंड गर्दी जाणवते. भारतात असे एकुण किती डिमार्ट आहेत ? आणि त्यांचे उत्पन्न किती असणार? असा एक सहजच प्रश्न तुम्हाला पडला असेलच. चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे.
Table of contents [Show]
वर्ष 2023 च्या तिमाहीत नफा वाढला
एवेन्यू सुपरमार्ट्सच्या मते, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 590 कोटी रुपये होता, आता हा नफा वार्षिक तुलनेत 6.6 टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 553 कोटी रुपये होता. FY2022 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 11569 कोटी रुपये होते.
DMart ची एकूण 324 दुकानं
कंपणीच्या मते, आर्थिक वर्ष 2022 च्या मार्च तिमाहीत कंपणीचे स्वतंत्र उत्पन्न 8606 कोटी रुपये होते. तर 31 मार्च 2023 पर्यंत कंपणीच्या एकुण शॉपची संख्या 324 होती, अशी माहिती एवेन्यू सुपरमार्ट्सने एक्सचेंजला दिली.
टप्प्या-टप्प्यात झाली उत्पन्नात वाढ
डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला 6.6 टक्के वाढीव नफ्यासह 590 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न झाले होते. तर आर्थिक वर्ष 2022 च्या ऑक्टोंबर आणि डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकुण वार्षिक उत्पन्न 11569 कोटी रुपये होते. तसेच डितेंबर महिन्याच्या तिमाहीत कंपनीच्या वर्षिक उत्पन्नात 25.5 टक्क्यांनी वाढ झालेली दिसुन आली.
शेअर्स मध्येही झाली वाढ
महत्वाचे म्हणजे 5 एप्रिल रोजी DMart चे शेअर बीएसईवर (BSE) 2.77 टक्कयांनी वाढून 3654.15 कोटी रुपयांपर्यंत पोहचले. DMart च्या शेअर्समध्यो 52 आठवड्यांत झालेली वाढ ही 4606 रुपये एवढी आहे.