रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये बदल केला नाही. त्यामुळे बहुतेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनांचे व्याजदरदेखील पूर्वीप्रमाणेच ठेवले. त्यात बदल केला नाही. तर काही बँका आपल्या एफडी (Fixed diposit) योजनांवर जास्त व्याज देऊ करत आहेत. याप्रमाणं बँकेला 888 दिवसांच्या ठेवीवर 9 टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. ज्या बँकांचा खूप जास्त प्रमाणात विस्तार झालेला नाही अशा छोट्या बँका सरकारी तसंच खासगी व्यावसायिक बँकांपेक्षा अधिक चांगला व्याजदर देतात.
Table of contents [Show]
लघु वित्त क्षेत्रातल्या बँकांचा व्याज दर जास्त
आर्थिक विस्तार लहान असलेल्याच बँकेशी संबंधित एफडीवर अधिक व्याज मिळत असल्याचं दिसतंय. यात 888 दिवसांच्या एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देणारी बँकदेखील लघु वित्त क्षेत्राशीच संबंधित आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एफडी असं या योजनेचं नाव आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेतर्फे ही योजना सुरू करण्यात आलीय. सामान्य गुंतवणूकदारांना 888 दिवसांसाठी पैसे गुंतवावे लागतात. त्यावर बँक 8.5 टक्के व्याज देते. तर यात योजनेद्वारे बँक ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ करून देत आहे.
सर्वसाधारण दर 8 टक्के
सर्वसाधारणपणे मुदत ठेव योजनांमार्फत बँकांकडून दिला जाणारा व्याज दर हा 8 टक्क्यांपेक्षा जास्त नसतो. खासगी तसंच सरकारी बँकादेखील 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दर देतात. अशात लघु वित्त क्षेत्रातली इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एक चांगला व्याजदर गुंतवणूकदारांना देत आहे.
मिळणार अतिरिक्त लाभ
अतिरिक्त लाभ मिळवण्याचीदेखील यात सुविधा आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या या एफडीवर व्याज प्रत्येक तिमाहीत जमा केलं जातं. हे व्याज एफडीच्या मूल्यामध्ये जोडलं जातं. अशाप्रकारच्या चक्रवाढ व्याजामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मुदत ठेवीवर 8.77 टक्के प्रभावी असा व्याजदर मिळतो. यात पुन्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक लाभ आहे. त्यांना 9.31 टक्के इतका व्याज दर दिला जातो.
विमा संरक्षण
चक्रवाढ व्याजाचा फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमार्फत दिला जातो. मासिक, त्रैमासिक आणि त्याहून अधिक कालावधीच्या जवळपास सर्व एफडीवर हा लाभ उपलब्ध करण्यात आला आहे. समजा गुंतवणूकदाराला मासिक पद्धतीनं व्याज भरायचं असेल, तर तशीही व्यवस्था आहे. बँकेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना रिझर्व्ह बँकेच्या ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून विमा संरक्षणदेखील दिलं जातं.
एफडी गुंतवणुकीत वाढ
मागच्या काही काळापासून एफडीत गुंतवणूक वाढलीय. विशेषत: कोविडनंतरच्या कालावधीत सरासरी 20 टक्के वाढ नोंदवण्यात आलीय. विविध बँका विविध व्याज दर देतात. अर्थात ज्या बँकांचा निधी अधिक आहे, अशा बँका चांगला व्याजाचा दर देण्यास सक्षम असतात. तर गुंतवणूकदार आपल्या आर्थिक गरजेनुसार या एफडीत गुंतवणूक करत असतात. सध्या एचडीएफसी बँकेत सर्वाधिक एफडी असल्याचं दिसतंय. मागच्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीतली ही आकडेवारी असून शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडापेक्षा एफडीला अधिक पसंती दिली जात असल्याचं दिसतंय.